अरविंद केजरीवाल यांच्या कारवर गुंडांनी हल्ला केला, असा दावा आम आदमी पक्षाने एक व्हिडिओ जारी करुन केला आहे. (Image source- X)
Published on
:
18 Jan 2025, 12:10 pm
Updated on
:
18 Jan 2025, 12:10 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पाेहचली आहे. आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कारवर भाजप उमेदवाराच्या गुंडांनी हल्ला केला, असा दावा आज (दि. १८) आम आदमी पक्षाने साेशल मीडियावर एक व्हिडिओ जारी केला आहे. केजरीवाल यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि त्यांच्यावर दगडफेकही करण्यात आल्याचा दावा आपने केला आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या कारने आमच्या कार्यकर्त्यांना चिरडले. आमच्या एका कार्यकर्त्यांचा पाय तुटला आहे, असा आराेप भाजपने केला आहे.
भाजप उमेदवाराच्या गुंडांची केजरीवालांच्या कारवर दगडफेक : आप
आम आदमी पक्षाने X वर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, 'भाजप पराभवाला घाबरत आहे. भाजपच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्या कारवर हल्ला केला आहे. 'भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांच्या गुंडांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर प्रचार करत असताना विटा आणि दगडांनी हल्ला केला आणि त्यांना प्रचार करू नये म्हणून त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न केला. केजरीवाल तुमच्या भ्याड हल्ल्याला घाबरणार नाहीत, दिल्लीचे लोक तुम्हाला योग्य उत्तर देतील."
बीजेपी ने अपने गुंडों से दिल्ली के बेटे @ArvindKejriwal जी पर फिर करवाया हमला‼️
BJP अपनी हार पास देखकर इतनी बुरी तरह बौखला गई है कि वो केजरीवाल जी की जान लेने पर उतर आई है।
क्या दिल्ली की जनता के लिए काम करने का बदला, BJP केजरीवाल जी की हत्या करके लेना चाहती है? pic.twitter.com/LI83Z9eqMl
— AAP (@AamAadmiParty) January 18, 2025केजरीवालांच्या कारने दोन कार्यकर्त्यांना चिरडले : भाजप
भाजपने प्रत्युत्तर देत आम आदमी पक्षावर तीव्र हल्ला चढवला आहे. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवेश वर्मा म्हणाले की, केजरीवाल यांच्या काळ्या कारने आमच्या कार्यकर्त्यांना चिरडले. आमच्या एका कार्यकर्त्यांचा पाय तुटला आहे. मी कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी लेडी हार्डिंगकडे जात आहे. गेल्या ११ वर्षांपासून दिल्लीत चालणाऱ्या सरकारने दिल्लीत भ्रष्टाचार पसरवलाच नाही तर दिल्लीलाही उद्ध्वस्त केले आहे. मी देशवासीयांना आणि दिल्लीतील जनतेला आवाहन करण्यासाठी आलो आहे की तुम्हाला दिल्ली वाचवावी लागेल, ११ वर्षांत यमुना केवळ घाण झाली नाही तर ती नाल्यासारखी झाली आहे.
2 युवकों को तानाशाह से सवाल पूछना पड़ा भारी 😳
दिल्ली चुनावों में हार सामने देख बौखलाया महाठग। सवाल पूछने पर 2 युवाओं को जोरदार टक्कर मारकर भागे, दोनों युवक को लेडी हार्डिंग हॉस्पिटल ले कर गए
केजरीवाल क्या तुम्हारे लिए लोगों की जान की कोई कोई कीमत नहीं है? pic.twitter.com/nEZVLoxzEv
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 18, 2025हल्ला झाला नाही : दिल्ली पोलीस
केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याबाबत दिल्ली पोलिसांनी सांगितले की, अरविंद केजरीवाल त्यांच्यावर कोणताही हल्ला झाला नाही, लाल बहादूर सदनमध्ये अरविंद केजरीवाल यांची जाहीर सभा होती. भाजपचे काही लोक सभेला आले होते ज्यांना प्रश्न विचारायचे होते. यावेळी दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांना बाजूला केले आहे, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.