MDH : MDH मसाले जगभरात प्रसिद्ध आणि लोकप्रिय का आहेत?

2 hours ago 1

जगातील सर्वोत्तम आणि शुद्धतम चवीची ही कहाणी आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील घरातील एक अविभाज्य भाग असलेल्या मसाल्यांची ही कहाणी आहे. ‘एमडीएच मसाले’ने आपल्या 100 वर्षाहून अधिक काळाच्या प्रवासा दरम्यान शुद्धता आणि सर्वोच्च गुणवत्तेसाठी भरपूर प्रेम आणि कौतुक मिळवलं आहे. फार कमी ब्रँडच्या वाट्याला असे प्रसंग येतात. त्यात एमडीएच मसाले हे सर्वात वरच्या पातळीवर आहे.

एमडीएचच्या यशाचं रहस्य त्याच्या सर्व मसाल्यांची शुद्धता आणि गुणवत्तेत आहे. कंपनीकडून खरेदी करण्यात येणारे कच्चे मसाले जगातील सर्वश्रेष्ठांपैकी एक आहेत, त्यामुळेच गुणवत्ता टिकून आहे. जेव्हा कधी शुद्धतेची गोष्ट येते तेव्हा एका उदाहरणारून तुम्हाला ते कळून येईल. मिरच्या कुटण्यापूर्वी त्याचे देठ काढून टाकणारी एमडीएच ही एकमेव मसाला कंपनी आहे. मिरचीचं सर्वात शुद्ध रुप भारतीय आणि परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचेल हा त्यामागचा हेतू आहे.

एमडीएच मसाल्यांमध्ये वापरले जाणारे जीरे हे सर्वोच्च गुणवत्तेचे असतात. जगातील बहुतेक लोकांनी ते पाहिलेही नसतील. त्याशिवाय हळद आणि इतर मसल्यांची सर्वोत्तम गुणवत्ता आणि शुद्घतेच्या रुपात सोर्स केले जातात आणि व्यापकररित्या चेक केले जातात. शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण मसाले आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचविणे सुनिश्चित करण्यासाठी अत्यंत सावधानता बाळगली जाते.

या मसल्यांचं मूळ सियालकोट ( आताचा पाकिस्तान)मध्ये आहे. 1919मध्ये महाशय चुन्नी लाल गुलाटी यांनी मसाले विकण्याचं एक दुकान टाकलं होतं. त्याला ‘महाशियन दी हट्टी’ असं नाव दिलं होतं. त्यानंतर त्यांचे चिरंजीव महाशय धरमपाल गुलाटी यांनी हा बिझनेस वाढवला. धरमपाल गुलाटी यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव श्री राजीव गुलाटी यांनी हा बिझनेस आणखी वाढवून यशाची असंख्य शिखरे गाठली. ते या समूहाचे अध्यक्ष आहेत.

एमडीएच आपल्या क्षेत्रातील जाहिराती करण्यातही आघाडीवर आहे. टीव्हीवर मसल्यांची पहिली जाहिरात एमडीएचनेच तयार केली होती. वर्तमानपत्रात मसल्यांची जाहिरात छापून येणारी एमडीएच ही पहिली कंपनी आहे.

एमडीएच प्रायव्हेट लिमिटेडने वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी पाच अत्याधुनिक संयंत्र घेतले आहेत. मसाल्यांची चव आणि गुणवत्ता कायम राखण्यासाठी कंपनी उत्पादन केंद्रांकडून थेट कच्चा माल खरेदी करते. खास मशिनद्वारा कच्च्या मालाचं विश्लेषण केलं जातं. त्यानंतर विविध टप्प्यातून गेल्यावर काळजीपूर्वक तयारी करून तो माल दळला जातो. या प्रक्रियेसाठी संपूर्णपणे स्वयंचलित मशीन लावण्यात आल्या आहेत.

हाताने दळण्यापासून ते मशिनीपर्यंत…

सुरुवातीच्या काळात एमडीएच मसाले हाताने दळले जायचे. परंतु, वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी एमडीएचने लवकरच स्वयंचलित मशिनींचा वापर करण्यास सुरुवात केली. कोट्यवधी रुपयांचे मसाले आधुनिक मशीनद्वारा उत्पादित आणि पॅक केले जात आहेत. भारत आणि परदेशात 1000 हून अधिक स्टॉकिस्ट्स आणि 4 लाखाहून अधिक किरकोळ डीलरांच्या नेटवर्कच्या माध्यमातून ते विकले जातात. दिवसाला 30 टन मसाल्यांना पावडरमध्ये पॅक करण्याची या मशिनची क्षमता आहे. हे मसाले विविध आकारांच्या (10g ते 500g) सुंदर पाऊचमध्ये पॅक केलं जातं.

पुरस्कार आणि सन्मान

काळानुसार एमडीएच आणि त्यांच्या लीडर्सना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. काही उल्लेखनीय पुरस्कारांमध्ये ITID गुणवत्ता उत्कृष्टता पुरस्कार, गुणवत्तेतील उत्कृष्टतेसाठी “आर्क ऑफ यूरोप” पुरस्कार आणि दादाभाई नौरोजी पुरस्कारांचा समावेश आहे. 2019मध्ये महाशय धरमपाल गुलाटी यांना भारतातील तिसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार, पद्म भूषण देऊन गौरवण्यात आलं होतं.

मसल्यांच्या शुद्धतेशिवाय एमडीएच सुद्धा सामाजिक कारणांसाठी आपल्या कामांनी अनेक लोकांचं जगणं सुसह्य करत आहे. महाशय धर्मपाल एकदा म्हणाले होते की, माझं 90 टक्के वेतन दान करण्यात जातं. त्यांनी 300 हून अधिक बेडचं रुग्णालय बांधलं आहे. 20 हून अधिक शाळा बांधल्या आहेत. एप्रिल 2020मध्ये करुणेच्या एका कामात त्यांनी COVID-19शी लढणाऱ्या आरोग्य स्वयंसेवकांना 7,500 पीपीई किट दान केले होते. आता राजीव गुलाटी हे पुण्य कर्म पुढे घेऊन जात आहेत.

आज एमडीएच मसाले आणि त्यांचे मिश्रण भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहेत. संयुक्त राज्य अमेरिका, कॅनडा, यूनायटेड किंगडम, यूरोप, दक्षिण पूर्व आशिया, जापान, यूएई आणि सौदी अरबमध्ये एमडीएचची उत्पादने निर्यात केली जात आहेत. कंपनीचे लंडन (यूके)मध्ये कार्यालय आहे. शारजाह (यूएई)मध्येही एक अत्याधुनिक मॅन्यूफॅक्चरिंग युनिट आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article