मोठी बातमी:बदलापूर लैंगिक प्रकरणातील शाळा संस्थापक व संचालक पोलिसांच्या ताब्यात

1 hour ago 1
बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील शाळेचे संस्थापक व संचालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तुषार आपटे आणि उदय कोतवाल असे अटक झालेल्या आरोपींचे नाव आहेत. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाने या दोघांच्या अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. ठाणे क्राइम ब्रॅंचकडून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तसेच या दोघांना एसआयटीच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून हे दोन्ही आरोपी फरार होते. आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतर शाळेच्या संस्थापक आणि संचालकांना देखील अटक करण्याची मागणी विरोधकांनी लाऊन धरली होती. लैंगिक आत्याचाराची घटना ज्या शाळेत झाली होती त्या शाळेचे संचालक व सचिव यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून संचालक आणि सचिवांनी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. दोघांना अटकेपासून दिलासा देण्याचे हे प्रकरण नाही, अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरार आरोपींना वाचवले जात असून पोलिसांकडून संस्थाचलकांना अद्याप अटक झाली नसल्याचा आरोप अक्षय शिंदेच्या वकिलांनी केला आहे. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब करून पुरावे देखील नष्ट केले असल्याचे वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणातील खऱ्या आरोपींना अटक व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, आरोपी अक्षय शिंदेच्या वकिलांनी देखील पोलिसांकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला होता. शाळेमध्ये घडलेली घटना पोलिसांपर्यंत शाळा व्यवस्थापनाने पोहोचवली नाही तसेच सीसीटीव्ही फुटेज गायब आहेत. पुरावे नष्ट करण्याचे कलम शाळा व्यवस्थापनावर लावण्यात आलेले नाहीत. तसेच पोलिसांनी अद्याप फरार शाळा व्यवस्थापनातील आरोपींना पकलडे नाही, असा आरोप वकील अमित कटारनवरे यांनी केला आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article