वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनच्या एंट्री/एक्झिट ए४ च्या बाहेर शुक्रवारी आग लागल्याची घटना घडली.(File Photo)
Published on
:
15 Nov 2024, 9:13 am
Updated on
:
15 Nov 2024, 9:13 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) मेट्रो स्टेशनच्या एंट्री/एक्झिट ए४ च्या बाहेर शुक्रवारी आग लागल्याची घटना घडली. यामुळे स्थानकात धूर येऊ लागला. यामुळे बीकेसी स्टेशनवरील प्रवासी सेवा तात्पुरत्या बंद करण्यात आली आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे.
घटनास्थळी अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम करत आहे. एमएमआरसी आणि डीएमआरसीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत, असे मुंबई मेट्रोकडून सांगण्यात आले आहे. बीकेसी मेट्रो स्थानकासमोरील आयकर कार्यालयाजवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून ही आग पसरली आहे. या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रवाशांना तातडीने स्थानकातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Passenger services at BKC station are temporarily closed due to a fire outside Entry/Exit A4, which caused smoke to enter the station. Fire Brigade is on the job. Senior Officers of MMRC & DMRC are at site: Mumbai Metro pic.twitter.com/KLCQ4zROWY
— ANI (@ANI) November 15, 2024