काल मतदारांनी केलेल्या मतदानानंतर दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. दरम्यान, येत्या शनिवारी म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात काल दिवसभरात ६५.०२ टक्के मतदान झाल्याची नोंद...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान नुकतंच २० नोव्हेंबर रोजी पार पडलं. काल मतदारांनी केलेल्या मतदानानंतर दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत कैद झाले आहे. त्यामुळे आता निकालाची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. दरम्यान, येत्या शनिवारी म्हणजे २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राज्यात काल दिवसभरात ६५.०२ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत राज्यातील मतदानाची टक्केवारी ही ४ टक्क्यांनी वाढली आहे. असे असले तरी, मुंबई आर्थिक राजधानी असलेल्या भागात झालेल्या मतदानाची टक्केवारी ही चिंताजनक असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत सर्वाधिक ५८ टक्के मतदान माहिम मतदारसंघात तर सर्वात कमी ४४ टक्के मतदान हे कुलाबा येथे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील कुलाबा भाग हा उच्चभ्रू वस्तीचा भाग मानला जातो. त्या ठिकाणी राहणारी लोकं ही सुशिक्षित असल्याचे मानले जाते मात्र त्याच ठिकाणी सर्वात कमी मतदान झाल्याची बाब समोर आले आहे. ही खेदाची गोष्ट आहे. यासोबत मुंबादेवी येथे ४८.७६ टक्के मतदार झालंय. तर वडाळा येथे ५७. ३७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
Published on: Nov 21, 2024 12:27 PM