मुंबई (Mumbai) :- अतिवृष्टी, पूर, अवेळी पाऊस, दुष्काळ, वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे (natural disaster) बाधित झालेल्या शेतकरी व अन्य घटकांना राज्य शासनाने वेळोवेळी शासन निकषानुसार मदत जाहीर केली होती. यातील ५ लाख ३९ हजार ६०५ लाभार्थ्यांना ५९२ कोटी ३४ लाख ९० हजार ५३० रुपयांची मदत संबंधित लाभार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यावर मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत (Department of Disaster Management) डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांची माहिती
आधारसंलग्न बँक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आलेल्या मदतीमध्ये अतिवृष्टी/पूर सन २०२२, सन २०२३, सन २०२४, अवेळी पाऊस २०२२-२०२३, व २०२३-२०२४, अवेळी पाऊस/अतिवृष्टी २०२३-२०२४, दुष्काळ २०२३ आणि जून २०१९ मध्ये वादळी वारा व गारपीट या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या लाभार्थींचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकरी व नागरिकांना शासनाकडून ही मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर वर्ग झाल्यामुळे या घटकांना दिलासा मिळेल, असा विश्वासही मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी व्यक्त केला. मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, या मदतीमध्ये अमरावती विभागामध्ये ४ हजार ६७१ लाभार्थ्यांना ७ कोटी ४० लाख २९ हजार ८२० रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात अकोला जिल्ह्यातील ३६३ लाभार्थ्यांना ५१ लाख ९६ हजार ९४२ रुपये, अमरावती जिल्ह्यातील १ हजार ६३० लाभार्थ्यांना ३ कोटी ६१ लाख ८१ हजार ८८६ रुपये, बुलढाणा जिल्ह्यातील ६७४ लाभार्थींना १ कोटी २ लाख ५४ हजार ३८७ रुपये, वाशिम जिल्ह्यातील ४०१ लाभार्थींना ४९ लाख १९ हजार ४८८ रुपये तर यवतमाळ जिल्ह्यातील १ हजार ६०३ लाभार्थींना १ कोटी ७४ लाख ७७ हजार ११८ रुपयांची मदत वर्ग केली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली
छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये ४ लाख ८३ हजार ८८३ लाभार्थींना ५१४ कोटी ८५ लाख २३ हजार २६० रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यात बीड जिल्ह्यातील १ लाख १५ हजार ९१० लाभार्थींना १०६ कोटी १२ लाख ७७ हजार ४२२ रुपये, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ३ हजार ४६३ लाभार्थींना २ कोटी ४२ लाख ७३ हजार ४७१ रुपये, धाराशिव जिल्ह्यातील २७ हजार ३०७ लाभर्थ्यांना ३६ कोटी २४ लाख ७ हजार ७४८ रुपये, हिंगोली जिल्ह्यातील ५६ हजार ८१ लाभार्थीना ६९ कोटी ७१ लाख ९७९ रुपये, जालना जिल्ह्यातील ८ हजार २४५लाभार्थींना १० कोटी ७४ लाख ७६ हजार ३९७ रुपये, लातूर जिल्ह्यातील २३ हजार ८४१ लाभार्थींना २१ कोटी ३४ लाख ४३ हजार ७५ रुपये, नांदेड जिल्ह्यातील २ लाख ३३ हजार २४२ लाभार्थींना २५० कोटी २८ लाख १ हजार ९५२ रुपये आणि परभणी जिल्ह्यातील १५ हजार ७९४ लाभार्थींना १७ कोटी ९७ लाख ४२ हजार २१७ रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.
नागपूर विभागात २० हजार ८९८ लाभार्थींना २६ कोटी ४३ लाख १० हजार ८६४ रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले
कोकण विभागामध्ये ८६५ लाभार्थ्यांना २१ लाख ८१ हजार ७८१ रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील १६ लाभार्थ्यांना १ लाख १० हजार ४८७ रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील ३ लाभार्थ्यांना ८ हजार ६०० रुपये, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०३ लाभार्थ्यांना १२ लाख ८८ हजार ६३४ रुपये, ठाणे जिल्ह्यातील एका लाभार्थीस ९ हजार रुपये, पालघर जिल्ह्यातील १४२ लाभार्थीना ७ लाख ६५ हजार ६० रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत. नागपूर विभागात २० हजार ८९८ लाभार्थींना २६ कोटी ४३ लाख १० हजार ८६४ रुपये बॅक खात्यावर डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील १७६ लाभार्थीना २२ लाख ५६ हजार २१० रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील ५ हजार २८८ लाभार्थीना ४ कोटी ८६ लाख ७४ हजार ७५३ रुपये, गडचिरोली जिल्ह्यातील ६ हजार ७५२ लाभार्थ्यांना ८ कोटी ११ लाख ९४ हजार २१३ रुपये, गोंदिया जिल्ह्यातील ३ हजार १४६ लाभार्थींना ४ कोटी १२ लाख ४७ हजार २२३ रुपये, नागपूर जिल्ह्यातील ३ हजार ८७४ लाभार्थींना ७ कोटी ४० लाख ३० हजार ६७६ रुपये तर वर्धा जिल्ह्यातील १ हजार ६६२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर १ कोटी ६९ लाख ७ हजार ७९० रुपये डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील ३ हजार ३८३ लाभार्थ्यांना २ कोटी ३२ लाख ४५ हजार ९५२ रुपये
नाशिक विभागात १ हजार ९०९ लाभार्थ्यांना २ कोटी ७१ लाख ९१ हजार ७९१ रुपयांची मदत आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात २२८ लाभार्थींना २९ लाख ६६ हजार ५४६ रुपये, धुळे जिल्ह्यातील ११५ लाभार्थीना १३ लाख ६१ हजार ४३७ रुपये, जळगाव जिल्ह्यातील १ हजार २६ लाभार्थींना १ कोटी ८७ लाख २९ हजार ७९५ रुपये, नंदूरबार जिल्ह्यातील ८ लाभार्थींना १ लाख २२ हजार ३१५ रुपये तर नाशिक जिल्ह्यातील ५३२ लाभार्थींना ४० लाख ११ हजार ६९९ रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात अली आहे. पुणे विभागात २७ हजार ३७९ लाभार्थींच्या बँक खात्यावर ४० कोटी ७२ लाख ५३ हजार १३ रुपयांची मदत डीबीटीद्वारे वर्ग करण्यात आली आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार ६४ लाभार्थ्यांना ९९ लाख ६२ हजार ३७ रुपये, पुणे जिल्ह्यातील ३ हजार ३८३ लाभार्थ्यांना २ कोटी ३२ लाख ४५ हजार ९५२ रुपये, सांगली जिल्ह्यातील १ हजार ७८७ लाभार्थ्यांना १ कोटी ७७ लाख ४४ हजार २७९ रुपये आणि सोलापूर जिल्ह्यातील २१ हजार १४५ लाभर्थ्यांना ३५ कोटी ६३ लाख ७४५ रुपये रुपयांची मदत डीबीटीद्वारे आधारसंलग्न बँक खात्यावर वर्ग करण्यात आली.