आ. ढिकले यांच्या प्रचारार्थ नाशिक पूर्व मतदारसंघातील जेलरोड परिसरात श्री संत नरहरीनगर भागात प्रचारसभा पार पडली. pudhari
Published on
:
17 Nov 2024, 4:37 am
Updated on
:
17 Nov 2024, 4:37 am
नाशिक : नाशिक पूर्व मतदारसंघातील विकासाचा चेहरा असलेला आमदार म्हणून प्रसिध्द असलेल्या महायुतीचे भाजपचे उमेदवार आ. ॲड. राहुल ढिकले यांनी जेलरोड परिसरात निर्माण केलेल्या प्रचाराच्या वादळाने आणि आक्रमक शैलीने विरोधकांना धडकी भरली आहे.
आ. ढिकले यांच्या प्रचारार्थ नाशिक पूर्व मतदारसंघातील जेलरोड परिसरात श्री संत नरहरीनगर भागात प्रचारसभा पार पडली. व्यासपीठावर नाशिकरोड विभागाचे माजी सभापती विशाल संगमनेरे, माजी नगरसेवक दिनकर आढाव, शरद मोरे, सचिन हांडगे, मीराबाई हांडगे, सुरेखा निमसे, कुंदा शहाणे, शंकर बोराडे, अरुण माळवे, राहुल गायकवाड आदी उपस्थित होते. 'दादागिरी करणाऱ्यांनो सावधान, जर तुम्ही जनतेला त्रास दिला तर तुमचा सामना माझ्याशी आहे. मी फक्त वकील नाही तर पहिलवानही आहे. कायद्याची ताकद आणि शरीराची बळकटी दोन्ही माझ्याकडे आहेत. हिम्मत असेल तर समोर या अशा शब्दांत ढिकले यांनी विरोधकांना आव्हान दिले आहे. वेळ आली की खोटेपणाचा बुरखा फाटतोच, असे नमूद करत जेलरोडवासियांवर अन्याय सहन करणार नाही, असा इशाराही ढिकले यांनी विरोधकांना दिला.
सोनार समाजाला उद्देशून ढिकले यांनी आदर व्यक्त केला. तुम्हाला खऱ्या सोन्याची पारख आहे. खऱ्या खोट्याची जाण आहे. तुम्ही योग्य उमेदवाराला निवडून आणाल यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, प्रभू श्रीरामाची सर्वात मोठी ७० फुटी मूर्तीची उभारणी, २४२ कोटींची पाणीपुरवठा योजना आदी विकासकामांची माहिती त्यांनी देत जनतेचे लक्ष वेधून घेतले.
मतदारांकडून उत्स्फूर्त स्वागत
जेलरोड परिसरातील गोकुळधाम अपार्टमेंट, भैरवनाथ नगर, प्रगती नगर, विमल नगर, ब्रीजनगर, हिंदनगर, श्री संतनरहरीनगर, सुवर्णनगर, संभाजीनगर, सद्गुरूनगर, शिवशक्तीनगर, मॉडेल कॉलनी, टाकेकर वसाहत, माळी कॉलनी, गवा चौक, ढिकलेनगर, जयंतनगर आदी प्रभाग १७ व१८ परिसरात ॲड. ढिकले यांनी प्रचारदौरा केला. यावेळी मतदारांनी ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.