Nashik | नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाजवळून चंदन वृक्ष चोरण्याचा प्रयत्न

2 hours ago 1

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाजवळून चंदन वृक्ष चोरण्याचा प्रयत्नFile Photo

पुढारी वृत्तसेवा

Published on

30 Sep 2024, 7:15 am

Updated on

30 Sep 2024, 7:15 am

नाशिक : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाबाहेर चंदन चोरट्याने चंदनाचे झाड तोडून नेल्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने शासकीय कर्यालयांच्या सुरक्षीततेचा प्रश्न पुन्हा एेरणीवर आला आहे.

चंदन चोरटे शासकीय कार्यालये, निवासस्थानांच्या आवारात घुसून चंदन चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक निवासस्थानांसह औद्योगिक वसाहतींमधून चंदन वृक्ष तोडून चोरी केल्या होत्या. चाेरी करताना चोरट्यांनी सुरक्षारक्षकांना मारहाण केल्याचे उघड झाले आहे. या घटनांमुळे चंदन चोरट्यांचा प्रश्न एेरणीवर आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चंदन चोरटे पकडले. त्यानंतरही चंदन चोरीचे प्रकार घडत आहेत. कारागृह रक्षक आशा फड यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (दि.२५) मध्यरात्री कारागृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील मोकळ्या जागेत असलेले चंदन वृक्ष तोडून नेण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी चोरट्यास हटकले. त्यामुळे चोरटा तेथून पसार झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस तपास करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article