Published on
:
18 Nov 2024, 3:43 am
Updated on
:
18 Nov 2024, 3:43 am
नाशिक (सटाणा) : मनुष्याला जगण्यासाठी जशी ऑक्सिजनची गरज आहे, त्याच पद्धतीने शेतकऱ्याला पाण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्यामुळे जोपर्यंत शंभर टक्के जलसिंचन पूर्ण होत नाही, तोपर्यंत भारत आत्मनिर्भर होणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
रविवारी (दि.१७) येथील पाठक मैदानावरील प्रचारसभेत बोलताना गडकरी यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील शासनाने केलेल्या विविध विकासात्मक कामांबाबत माहिती दिली. काँग्रेसच्या काळात खेड्याकडे दुर्लक्ष झाले. चुकीच्या आर्थिक धोरणामुळे खेड्यांचे अनन्वित नुकसान झाले. गावात मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले. सर्वच उद्योग शासनाने सुरू केले आणि या चुकीच्या धोरणामुळे देशाला फटका बसला, असेही गडकरी यांनी सांगितले. सटाणा शहरासाठीच्या बायपासचा प्रस्ताव दिल्लीला पोहोचला असून, विधानसभा निवडणुका आटोपताच त्यास मंजुरी देण्यात येईल, अशी घोषणाही गडकरी यांनी केली.