संध्याकाळचे चार-पाच वाजताच काहीतरी चविष्ट आणि चटपटीत खाण्याचा मोह आपल्या सोबतच घरातील लहान मुलांना देखील होतो. आजच्या काळात बहुतेक लोक बाहेरचे अन्न खाणे टाळू लागले आहे. कारण बाहेर कोणते तेल वापरले असेल हे माहिती नसते. अशा परिस्थितीत घरी काय चटपटीत बनवता येईल जे पटकनही होईल आणि खायलाही स्वादिष्ट असेल. अशा गोष्टीच्या तुम्ही शोधात असाल तर अशीच एक रेसिपी जाणून घेऊया.
बटाटा हा प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतोच. मुलांना आणि तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी चटपटीत आणि स्वादिष्ट खायचं असेल तर तुम्ही पेरी पेरी चिप्स बनवून खाऊ शकतात. मुलांना बाहेरच्या चिप्स देण्यापेक्षा हा पर्याय फायदेशीर ठरेल.यासाठी शेफ संजीव कपूर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक अतिशय सोपी रेसिपी शेअर केली आहे. जाणून घेऊया पेरी पेरी चिप्स बनवण्यासाठी कोणत्या साहित्याची आवश्यकता आहे आणि हे चिप्स बनवण्याची पद्धत.
चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
बटाटे
तेल
पेरी पेरी मसाला तयार करण्यासाठी साहित्य
धने – दोन चमचे
जिरे – अर्धा चमचा
काळा मसाला – अर्धा चमचा
लसूण पेस्ट – अर्धा चमचा
ओरेगॅनो – दोन चमचे
तेजपान – एक
सुकलेल्या लाल मिरच्या
मीठ
पेरी पेरी चिप्स बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका पॅनमध्ये धने, जिरे, काळा मसाला, तेज पान आणि सुकलेल्या लाल मिरच्या टाकून भाजून घ्या.
हे व्यवस्थित भाजल्यानंतर त्याला मिक्सरमध्ये टाका. यासोबतच उर्वरित बाकी मसाले ह्याच्या सोबत टाकून एक बारीक पावडर तयार करून घ्या.
हे मसाले मिक्सर मधून काढल्यानंतर पेरी पेरी मसाला तयार आहे.
आता बटाटे, धुऊन सोलून त्याला चिप्सच्या आकाराचे किसून घ्या.
किसलेल्या बटाट्यांच्या कापांना पुन्हा एकदा धुऊन एका कपड्यावर सुकायला ठेवा.
त्यानंतर तेल गरम करून त्यामध्ये बटाट्याचे काप तळून घ्या.
तयार चिप्स वर तयार केलेल्या मसाला वरून टाका आणि तु.मचे पेरी पेरी चिप्स तयार आहेत.