इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये हल्ला करून हिजबुल्लाच्या प्रवक्त्याला ठार मारले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात हिजबुल्लाच्या प्रवक्त्यासह किमान सहा जण ठार झाल्याची पुष्टी लेबनॉनने केली आहे. तर 50 हूनअधिक जण जखमी झाले आहेत.
हिजबुल्लाहचे तळ दक्षिण बेरूतमध्ये असल्याने इस्रायल या भागाला लक्ष्य करत होते. बेरूतच्या रास अल-नाबा जिल्ह्यात इस्त्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा मीडिया संबंध प्रमुख मोहम्मद अफिफ मारला गेला आहे. त्यानंतर काही वेळातच मार एलियास भागात एक हल्ला झाला ज्यामध्ये दोन जण ठार झाले आणि 22 हून अधिक लोक जखमी झाले. मार एलियासचा परिसर खूप दाट लोकवस्तीचा आहे. इस्रायलच्या विमानांनी या भागात बॉम्बहल्ला केला. एएफपीच्या वृत्तानुसार, हवाई हल्ल्यानंतर सायरन वाजू लागले .
मिळालेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रॉनिक स्टोअर आणि वाहनावर बॉम्बहल्ले करण्यात आले. हिजबुल्लाचा प्रवक्ता मारला गेल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे. लेबनॉनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, बेरूतमधील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद राहतील. इस्त्रायली हल्ल्यात एकाच ठिकाणी चार जणांचा मृत्यू झाला तर 14जण जखमी झाले. इस्त्रायली लष्कराने सांगितले की, दोन दिवसांत 200 ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. दक्षिण लेबनॉनमध्ये किमान 11 लोक ठार झाले असून 50 हून अधिक जखमी झाले आहेत