परभणी(Parbhani) :- बँकेचा कर्मचारी आहे, असे भासवून व्यापार्याला फोन करत विश्वासात घेतले. क्रेडिट कार्डची (Credit card)माहिती घेऊन संमती विना ९९ हजार ८१७ रुपये काढून घेत व्यापार्याची फसवणूक (Fraud)केली. हा प्रकार परभणी शहरातील राणी लक्ष्मीबाई रोड भागात घडला. या प्रकरणी फसवणूक करणार्या अज्ञात मोबाईल धारकांवर २२ जानेवारीला कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
क्रेडिट कार्डवरुन लाख रुपये काढून घेतले; गुन्हा दाखल
गोविंद बालकिशन सोनी यांनी तक्रार दिली आहे. २१ डिसेंबर रोजी सकाळी साडे दहा ते बारा या दरम्यान त्यांना चार वेगवेगळ्या क्रमांकावरुन फोन आला. समोरील अनोळखी व्यक्तीने पंजाब नॅशनल बँकेचा (Punjab National Bank)कर्मचारी आहे, असे भासवून फिर्यादीशी बोलत त्यांना विश्वासात घेतले. फिर्यादीच्या बँक ऑफ बडोदाचे क्रेडिट कार्ड नंबर घेतला. त्याद्वारे ९९ हजार ८१७ रुपये फिर्यादीच्या संमती विना काढून घेतले. ऑनलाईन पध्दतीने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गोविंद सोनी यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठत संबंधित अज्ञात मोबाईल धारकाविरुध्द तक्रार दिली. फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला असून तपास पोनि. संजय ननवरे करत आहेत.