बालसाहित्य बोलीभाषेत असावे:मुलांच्या भावविश्वाला समजेल अशी पुस्तके हवीत, बालकुमार साहित्य संमेलनात मत

6 hours ago 1
पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनात बालसाहित्याच्या सद्य:स्थितीवर महत्त्वपूर्ण चर्चा झाली. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई पुरस्कृत या संमेलनात तज्ज्ञांनी बालसाहित्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या सूचना मांडल्या. जालिंदर डोंगरे यांनी बालसाहित्याची सद्य:स्थिती आश्वासक असल्याचे सांगितले. मात्र शहरी भागात जास्त प्रमाणात होणारी साहित्यनिर्मिती ग्रामीण भागापर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली. शहरी भागातील शब्द आणि संदर्भ ग्रामीण मुलांना समजत नसल्याने, ग्रामीण भागातही दर्जेदार बालसाहित्य निर्मितीची गरज त्यांनी अधोरेखित केली. अनिल कुलकर्णी यांनी बालसाहित्य लेखकांनी मुलांच्या मनोविश्वाचा अभ्यास करण्याची आवश्यकता व्यक्त केली. बोलीभाषेतील शब्द लोप पावू नयेत यासाठी ग्रामीण भाषेतही साहित्यनिर्मिती व्हावी असे त्यांनी सुचवले. पालकांनी मुलांना चांगली पुस्तके उपलब्ध करून देऊन वाचनाची आवड निर्माण करावी असेही त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी असलेले डॉ. कैलास दौंड यांनी शाळांमधील ग्रंथालयांत दर्जेदार पुस्तके असावीत असे मत मांडले. बालसाहित्याच्या प्रसारासाठी संस्थांची उभारणी करून त्यांचे नेटवर्क तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. बालसाहित्यिकांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी त्यांना दीपस्तंभाची उपमा दिली. परिसंवादात सर्व वक्त्यांनी बालसाहित्य मुलांच्या भावविश्वाला समजेल असे असावे, त्यात दुर्बोधता नसावी आणि ते रंजक व मनोरंजक असावे अशी एकमताने भूमिका मांडली. बालसाहित्याविषयी समाजात आज संमिश्र भावना आहेत. बालसाहित्यातील दुर्बोधता कमी व्हावी. प्रमाणभाषेच्या वापरापेक्षा बोलीभाषेतील साहित्याची निर्मिती व्हावी, ज्यायोगे ते मुलांच्या भावविश्वाला रुचेल. ग्रंथालयात सुमार दर्जाची पुस्तके नकोत, रंजकतेने परिपूर्ण पुस्तके मुलांना विशेष भावतात. वाचनासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करावे. त्यांनी काय वाचावे याविषयी पालकांनी निर्णय घेण्याऐवजी मुलांना काय वाचायला आवडते ते पालकांनी जाणून घ्यावे, असा सूर परिसंवादात उमटला. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुबंई पुरस्कृत अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे आणि शिवांजली साहित्यपीठ, शिवांजली ग्रामविकास प्रतिष्ठान, चाळकवाडी (ता. जुन्नर) आयोजित अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनातील पहिल्या सत्रात ‌‘बालसाहित्याची सद्य:स्थिती‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यात अनिल कुलकर्णी (पुणे), जालिंदर डोंगरे (जुन्नर) यांचा समावेश होता. अध्यक्षस्थानी डॉ. कैलास दौंड (पाथर्डी) होते. जालिंदर डोंगरे म्हणाले, बालसाहित्याची आजची स्थिती आश्वासक वाटते आहे. तिचा प्रवास रंजकतेकडून मंजकतेकडे होत आहे. मागील पिढीत बालसाहित्यात विपुल संपदा निर्माण झाली. मधल्या काही काळात ते शहरी भागात जास्त प्रमाणात निर्माण होत होते. त्यामुळे गावपातळीवर ते पुरेसे पोहोचले नाही. बालसाहित्यातील दुर्बोधता कमी व्हावी, ते मुलांपर्यंत जाणीवपूर्वक पोहोचवावे. शहरी भागातील काही शब्द व संदर्भ ग्रामीण भागातील मुलांना आकलन होत नाहीत त्यामुळे ग्रामीण भागातही उत्तम दर्जाची बालसाहित्य निर्मिती व्हावी. रंगीत सचित्र पुस्तके मनोरंजनात्मक असतात अशी पुस्तके लहान मुलांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. अनिल कुलकर्णी म्हणाले, बालसाहित्याची निर्मिती करणाऱ्या लेखकांनी मुलांच्या मनोविश्वाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. मुलांच्या वयोगटानुसार साहित्याची निर्मिती होणे गरजेचे असून ग्रामीण भाषेतही साहित्याची निर्मिती व्हावी. अन्यथा बोलीभाषेतील अनेक शब्द काळानुसार लोप पावतील. पालकांनी सजगतेने मुलांना पुस्तके विकत घेवून द्यावीत आणि वाचनाची गोडी लावावी. लेखकांनी भरपूर वाचन करणे आवश्यक आहे, ज्यायोगे त्यांची वैचारिक बैठक तयार होते आणि त्यांना साहित्यबीजाचे आकलन होते. डॉ. कैलास दौंड म्हणाले, गावागावात शाळा-शाळांमध्ये ग्रंथालयात सुमार जर्दाची पुस्तके नकोत. मुलांच्या भाषेत आणि बोलीभाषेत बालसाहित्यिकांनी लिखाण करावे. बालसाहित्याच्या प्रचारासाठी संस्थांची उभारणी व्हावी आणि त्या एकमेकांशी जोडल्या जाव्यात. शिक्षणासह साहित्यकृतींच्या वाचनातून मुलांच्या व्यक्तीमत्त्वाची जडणघडण होत असते. बालसाहित्यिक दीपस्तंभासारखे कार्य करत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article