सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या मुलीला शिक्षणासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्यावतीने आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. Pudhari Photo
Published on
:
24 Jan 2025, 2:20 pm
Updated on
:
24 Jan 2025, 2:20 pm
पैठण : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच कै. संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आली. एक लाख रुपयांची आर्थिक मदत शुक्रवारी रोजी मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन देण्यात आली. न्याय हक्कासाठी लढा उभारणार असल्याचे छावा क्रांतिवीर सेना संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी जाहीर केले आहे.
कै.संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी आणि न्याय मिळेपर्यंत छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्रभर आंदोलन करत राहील, अशी भूमिका यावेळी संघटनेने मांडली. संतोष देशमुख यांचे बंधू धनाजी देशमुख व कुटुंबीयांना भविष्यात कोणत्याही स्वरूपाची मदत लागल्यास संघटनेचे पदाधिकारी तत्काळ मदतीसाठी सज्ज राहतील,असे आश्वासन देण्यात आले.
या शिष्टमंडळ भेटीमध्ये छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, आशिष हिरे, गणेश माने, राम पाटील गाडेकर,साईनाथ कर्डिले,ज्ञानेश्वर पालखेडे यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.