हिंदू धर्मात कुंभ संक्रांतीला खूप महत्त्व आहे. कुंभ संक्रांतीला स्नान केले जाते. कुंभ संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर दान केल्याने पुण्य प्राप्त होते. या दिवशी स्नान करून दान केल्याने सूर्य देवाची कृपा प्राप्त होते. सूर्याने मकर राशीतून कुंभ राशी प्रवेश केल्यानंतर कुंभ संक्रांत साजरी केली जाते. सूर्य फाल्गुन महिन्यात कुंभ राशीत प्रवेश करतो असे ज्योतिष शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे यावर्षी कुंभ संक्रांत कधी आहे ते जाणून घेऊ.
कधी आहे कुंभ संक्रांत
यावर्षी सूर्य 12 फेब्रुवारीला मकर राशि मधून कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. पंचांगानुसार 12 फेब्रुवारीला रात्री 10: 03 सूर्य मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल त्यामुळे उदय तिथीनुसार यावर्षी कुंभ संक्रांत 13 फेब्रुवारीला साजरी होणार आहे.
कुंभ संक्रांतीला पुण्य आणि महापुण्य काळ कधी आहे? पंचांगानुसार कुंभ संक्रांतीच्या दिवशी दुपारी 12: 36 मिनिटांनी पुण्यकाळ सुरू होईल. हा शुभकाळ संध्याकाळी 6: 10 मिनिटांनी संपेल. या दिवशी दुपारी 4: 19 मिनिटांनी महापुण्यकाळ सुरू होईल. या महा शुभ मुहूर्ताची समाप्ती संध्याकाळी 6: 10 मिनिटांनी होईल. यावेळी कुंभ संक्रांतीच्या दिवशी पुण्य काळ 5 तास 34 मिनिटांचा असेल तर महापुण्य काळ 2 तास 51 मिनिटांचा असेल.
कुंभ संक्रांतीची पूजा विधी
- कुंभ संक्रांतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पवित्र नदी स्नान करावे. जर तसे करणे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे.
- स्नानानंतर पाण्यात गंगाजल आणि तीळ मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे.
- यानंतर सूर्याच्या मंत्राचा जप करावा.
- सूर्य चालीसाचे पठण करावे.
- यानंतर घरातील मंदिरात दिवा लावा.
- पूजेनंतर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा पुजाऱ्याला दान करावे.
कुंभ संक्रांतीच्या दिवशी दानाचे महत्त्व
कुंभ संक्रांतीच्या दिवशी दान केल्या जाते. कुंभ संक्रांतीच्या दिवशी पुण्य काळ किंवा महापुण्यकाळात दान करावे. या दिवशी गरीब आणि गरजूंना कपडे, अन्न आणि ब्लॅंकेट दान करणे शुभ मानले जाते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)