परभणी (Parbhani) :- जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून अॅल्युमिनियम (Aluminium) तार चोरी करणार्या टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या जवळून १३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीच्या चौकशीत आठ गुन्हे उघड झाले आहेत.
परभणी स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई १३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त ..!
परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसात तार चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिस अधिक्षकांनी स्थानिक गुन्हा शाखेला चोरट्यांचा शोध लावण्याविषयी सूचना दिल्या. स्थागुशाच्या पथकाने गोपणीय माहिती काढत लक्ष्मण भागोजी पवार, जय भगवान काळे यांना ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन चौकशी केल्यावर त्यांनी इतर साथीदारांसोबत मिळून चोरी केल्याचे सांगितले. विद्युत खांबावरील(Electric pole) अॅल्युमिनियम तार चोरट्यांनी लंपास केली होती. चोरीत वापरण्यात आलेली वाहने देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. चोरी केलेली अॅल्युमिनियम तार सय्यद कलिमोद्दीन सय्यद जैनुलाबदीन यांना विक्री केल्याचे सांगितले. आरोपी जवळून चोरी करुन विक्री केलेल्या मुद्देमालाच्या रक्कमपैकी साडेतीन लाख रुपये रोख, मोबाईल आणि वाहने मिळून १३ लाख ८० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई स्थागुशाचे पो.नि. विवेकानंद पाटील, सपोनि. पांडुरंग भारती, राजु मुत्तेपोड, पोउपनि. गोपीनाथ वाघमारे, अजीत बिरादार, चंदन परिहार, सपोउपनि. मधुकर चट्टे, हनुमंत जक्केवाड, पोलिस अंमलदार हनुमंत तुपसुंदरे, विलास सातपुते, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, गायकवाड, फारुकी, रवि जाधव, दुधाटे, भदर्गे, सुर्यकांत फड, चव्हाण, ढवळे, ढगे, क्षीरसागर, शेख रफिक, परसोडे, घुगे, हुसेन, आव्हाड यांच्या पथकाने केली.