वाचन, ऐकून, पाहून आणि वैयक्तिक अनुभूती घेत आपली बौद्धिक क्षमता वाढत असते. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला विचारली की आपण चुटकीसरशी उत्तरं देतो. पण काही प्रश्न डोकं भंडावून सोडतात. अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार सोशल मीडियावर होत आहे. बघा त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहिती आहेत का?
बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी रोज वाचन करणं गरजेचं आहे. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. पण अनेकदा काही प्रश्न असे येतात की त्याची उत्तरं आपल्याकडे नसतात. कारण हे नुसते प्रश्न नसतात, तर बौद्धिक क्षमतेवर ताण पाडण्यास भाग पाडतात. अनेक विषय असून प्रत्येकाची माहिती आपल्याला असतेच असं नाही. इतिहास, भूगोल, विज्ञान, साहित्य, इतर गोष्टींचं ज्ञान असलं तरी कुठेतरी असे प्रश्न येतात की आपल्याला विचार करणं भाग पडतं. त्यामुळे सामान्य ज्ञान असणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे रोज वर्तमानपत्र, पुस्तकं वाचणं आवश्यक आहे. तसेच ज्ञानार्जन करण्याऱ्या चर्चाही पाहायला हव्यात. आता बघा ना..असेच काही प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. विचार करणं भाग पडतं. आज आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर विचारले जाणारे सहा प्रश्न टाकत आहोत. त्याची उत्तरं तुम्हाला जमतात का बघा. टेन्शन घेऊ नका, जर उत्तर माहिती नसतील तर त्याच्या खाली वाचा तुमच्या ज्ञानात भर पडेल.
- प्रश्न 1- भारतात कोणत्या राज्यात सर्वाधिक चांदी उपलब्ध आहे?
- उत्तर – भारतातील राजस्थान राज्यात सर्वाधिक चांदी मिळते.
- प्रश्न 2- वडिलांच्या आधी आणि आईच्या नंतर जे येतं, ते माझं नाव, सांगा मुलीचं नाव काय?
- उत्तर – वडिलांच्या नावापूर्वी ‘श्री’ आणि आईच्या नावानंतर उत्तर भारतात ‘देवी’ वापरतात. म्हणून मुलीचे नाव ‘श्रीदेवी’ येईल.
- प्रश्न 3- चंद्रावर खेळला गेलेला पहिला खेळ कोणता?
- उत्तर – चंद्रावर खेळला गेलला पहिला खेळ हा गोल्फ आहे.
- प्रश्न 4- असा कोणता देश आहे, जिथे एकही साप नाही?
- उत्तर- आयर्लंड हा एकमेव देश आहे जिथे एकही साप नाही.
- प्रश्न 5 – अशी कोणती गोष्ट आहे जी कापल्यानंतर गाणं गायलं जातं?
- उत्तर- बर्थ डे केक कापल्यानंतर लोक गाणं गाण्यास सुरुवात करतात.
- प्रश्न 6 – अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षभर वापरल्यानंतर फेकून दिली जाते?
- उत्तर- कॅलेंडर पूर्ण वर्षभर वापरल्यानंतर फेकून दिलं जातं. त्याचा नंतर वापर होत नाही.