नागपुरात वाढले सट्ट्याचे प्रमाण!
नागपुर (Nagpur) : नागपुरात सट्ट्याचे प्रमाण वाढले असून, यातच हिंगणा येथे 2 व्यक्ती ‘क्रिकेट लाईव्ह लाईन’ या ॲप (Cricket Live Line App) मार्फत ILT 2025 मॅचचे थेट धावफलकर लोकांकडून पैशाची खायवाडी करताना आढळून आले. सदर घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वार्ड नंबर 4 येथे घडली. ‘क्रिकेट लाईव्ह लाईन’ हा ॲप स्कोअर आणि थेट क्रिकेट सामने प्रदान करते. हे ॲप क्रिकेट मॅच हायलाइट व्हिडिओ देखील प्रदान करते. संधीचा फायदा घेत, 7 फेब्रुवारी रोजी ILT 2025 हंगामाच्या दुसऱ्या डेझर्ट व्हायपर्स (DV) आणि शारजाह वॉरियर्स (SWR) या मॅचचे लोकांकडून पैशाची खायवाडी करताना, आढळल्याने तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई..!
तसेच पारधी नावाच्या इसमाकडे उतारी करीत असल्याने, तिन्ही आरोपीतांचे हे कृत्य कलम 12 A महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे होत असल्याने आरोपींना (Accused) मुद्देमालासह जप्त करून, हिंगणा पोलीस ठाणे (Hingana Police Station) यांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट क्र. 1 पथकाने ही कारवाई केली.