परभणीच्या गंगाखेड-परळी रस्त्यावरील घटना!
गंगाखेड (Parbhani) : भरधाव वेगातील कार पलटी झाल्याने एक जण जागीच ठार व दोघे किरकोळ जखमी (Injured) झाल्याची घटना रविवार 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास गंगाखेड परळी रस्त्यावर शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर घडली. नागोराव कडाजी दंडवते असे मयत इसमाचे नाव आहे. परळी रस्त्याने गंगाखेड शहराकडे भरधाव वेगात येणारी कार (Car) क्रमांक एमएच 43 डी 9691 ही गंगाखेड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर सुरळवाडी पाटी परिसरात येताच चालकाला डुलकी लागल्याने रस्त्याच्या कडेला गेली.
पलटी झालेली कार उभी करून जखमींना काढले बाहेर…
पाच पलट्या घेत कार अपघातग्रस्त (Accident Victim) झाली. याच मार्गांवर रात्र गस्तीवर असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) आदित्य लोणीकर, पोलीस नाईक सुग्रीव सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने थांबवत त्यातील प्रवाशांच्या मदतीने पलटी झालेली कार उभी करून जखमींना बाहेर काढून खाजगी रुग्णवाहीका (Ambulance) चालक रावण भालेराव, 108 चे चालक विष्णू होरे यांच्या वाहनातून नागोराव कडाजी दंडवते वय 49 वर्ष, राधाकिशन कडाजी दंडवते वय 40 वर्ष रा. महातपुरी व मुंजाजी कारभारी आळसे वय 39 वर्ष रा. शेळगाव ता. सोनपेठ यांना उपचारासाठी गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) डॉ. शिल्पा टाके, परिचारिका सुमेधा नागरगोजे, अंकिता कदम, गोविंद वडजे आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार करून नागोराव कडाजी दंडवते वय 49 वर्ष रा. महातपुरी ता. गंगाखेड यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात (Gangakhed Police Station) अपघाताचा गुन्हा दाखल (Case Registered) करण्याची प्रक्रिया सुरु होती.