परभणी (Parbhani) :- गरीबीला कंटाळून एका २६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide)केली. ही घटना ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे घडली. या प्रकरणी ७ फेब्रुवारीला बोरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद
मिरा गायकवाड यांनी खबर दिली आहे. आकाश अशोक गायकवाड वय २६ वर्ष, रा. बसवेश्वर नगर कौसडी, असे मृतकाचे नाव आहे. आकाशने गरीबीला कंटाळून आपण काय खाणार या विचारातून राहत्या घरी गळफास घेतला. त्याला बोरी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू (Death) झाला. पोह. कोकाटे अधिक तपास करत आहेत.