Parbhani: घरफोडीत रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने लंपास

2 hours ago 1

परभणी/पाथरी (Parbhani):- अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम व सोन्या- चांदीचे (Gold And Silver)दागिने मिळून ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना पाथरी तालुक्यातील रेणापुर येथे ७ ऑक्टोबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणीच्या पाथरी तालुक्यातील रेणापुर येथील घटना

गणेश इदगे यांनी तक्रार दिली आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटात ठेवलेले रोख दहा हजार रुपये, तीस हजार रुपये किंमतीचे कानातील झुंबर, वीस हजाराचे सेवनपिस तसेच सोने व चांदीचे इतर दागिने मिळून ७३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तपास सपोनि. कृष्णा घायवट करत आहेत. घटनास्थळाला पोनि. मंडलवार यांनी भेट दिली.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article