कुर्हाडीने जीवे मारण्याची धमकी!
परभणी (Parbhani) : शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे महाराष्ट्र राज्य सुरक्षा दलाचे सुरक्षा गार्ड म्हणून काहीही अनर्थ घडू नये म्हणून प्रत्येक वार्डात नेमणूक असलेल्या सुरक्षा रक्षकास एका इसमाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात (Nanalpeth Police Station) इसमाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानलपेठ पोलीसात गुन्हा नोंद!
याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवार 31 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या (District General Hospital) वार्ड क्रमांक 6 मध्ये डॉक्टरांचा राऊंड चालू असताना एक इसम चहाची कॅटली घेऊन आत आला. सुरक्षा रक्षकाने आतमध्ये डॉक्टरांचा (Doctor) राऊंड सुरु असल्याचे सांगितले. तेव्हा त्या चहावाल्याने सुरक्षा रक्षकासोबतच वाद घातला. शिवीगाळ करत गळा धरला. तसेच धक्काबुक्की करत मारहाण (Beating) करण्यात आली. भांडणाचा आवाज ऐकूण वार्डच्या परिसरातील ड्युटीवर असलेले ए. एस. ओ. बोराटे व सहाय्यक सुरक्षा अधिकारी (Assistant Security Officer) राधेशाम जाधव आले. त्यांनी संबंधित इसमाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तेथून पळ काढला. पुन्हा सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्त्या इसमाने हातात कुर्हाड घेऊन जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा पळून गेला. या प्रकरणी वरिष्ठांची चर्चा करून आरोपी (Accused) शेख सुलेमान उर्फ बादल रा. कादराबाद प्लॉट परभणी याच्या विरुध्द शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात रामेश्वर अंकुशराव शेळके वय 27 वर्षे रा. आनंदवाडी ता. जि. परभणी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. सय्यद मुक्तार हे करीत आहे.