परभणी (Parbhani) :- समाजात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र (Maharashtra)राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष तथा सदस्य (सचिव दर्जा) अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.
शांतता, सलोखा सर्वांनी कायम ठेवावा
परभणी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर(Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची झालेली अवमानाची घटना व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अॅड. मेश्राम यांनी शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी विविध सामाजिक संघटनेचे नेते आणि शांतता समितीच्या सदस्यांची भेट घेऊन त्यांच्यासमवेत संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीस समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्रीमती भोजने उपस्थित होत्या. प्रारंभी उपस्थित नेते व सदस्यांनी सदर घटनेबाबत आपली मते मांडली. संविधान प्रतिकृती अवमान प्रकरणातील दोषींवर योग्य ती कार्यवाई निश्चितपणे होईल. समाजात शांतता कायम ठेवण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत.
तरुणांनी शिक्षणाची कास धरावी. समाजात आज विस्तारीत जाणारी सामाजिक दरी कमी करण्यासाठी सर्वांनीच सामाजिक सलोखा आणि शांततेकरीता पुढाकार घ्यावा, असे आवाहनही अॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केले.