परभणी (Parbhani):- जुना राग मनात धरत एकावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास परभणी शहरातील आयटीआय कॉर्नर (ITI Corner)येथे घडली. जखमीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात (Private hospitals) दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर ७ फेब्रुवारी रोजी कोतवाली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुना राग मनात धरत फिर्यादीच्या डोक्यात लाकडाने मारुन केले गंभीर
शेख महेफुज यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादी हे परभणी येथे कामानिमित्त आले होते. जेवणासाठी जिंतूर रोडवर गेले असता या ठिकाणी ओळखीतील सय्यद समीर आला. त्याने जुना राग मनात धरत फिर्यादीच्या डोक्यात लाकडाने मारुन गंभीर जखमी केले. त्यांच्या जवळील ४ हजार रुपये व मोबाईल काढून घेतला. जखमीला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथून पुढे खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. आरोपीवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.