जपानमधील ‘आम्ही पुणेकर’ ह्या ग्रुपतर्फे टोकियो येथे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांची अश्वारुढ प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. त्यानिमित्त महाराजांच्या अश्वारुढ प्रतिकृतीची हिंदुस्थानातील नऊ राज्यांमधून शिवस्वराज्य रथयात्रा काढली जात आहे.
ही रथयात्रा आज वरळीमध्ये दाखल झाली. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीचे पूजन करून शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे हे रथयात्रेत सहभागी झाले. महाराजांची प्रतिकृती टोकियोमध्ये स्थापन होणे आहे, ही माझ्यासहित प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.