Pusad Suicide Case: आजाराला कंटाळून व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

2 days ago 2

पुसद (Pusad Suicide Case) : वसंनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या श्री धनकेश्वर मंदिराच्या कमानीजवळ 19 नोव्हेंबर च्या पहाटे सहा वाजता च्या दरम्यान एका व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जमजम नगर श्री धनकेश्वर मंदिराच्या कमानीजवळ राहत असलेल्या व कॅन्सरच्या आजाराने त्रस्त असलेल्या शेख हुसेन शेख छोटू वय 55 वर्ष यांनी आजाराला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर हैदराबाद व नागपूर येथे उपचार सुरू होते.

मात्र आजार जास्त बळवल्याने ते सातत्याने त्रस्त राहत असत शेवटी त्यांनी गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. याप्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article