टेंडरच्या नावाखाली वडिलांच्या‎ मित्रांनाच गंडवले 15 कोटींना:साताऱ्याच्या कश्मिराचा आणखी एक प्रताप उघड‎

5 hours ago 1
फसवणुकीच्या गुन्ह्यात सध्या‎न्यायालयीन कोठडीत असलेल्या‎कश्मिरा पवारसह तिच्या‎साथीदारांविरुध्द सातारा शहर‎‎पोलिस ठाण्यात‎‎आणखी एक‎‎फसवणुकीचा‎‎गुन्हा दाखल‎‎झाला आहे.‎‎आपल्या‎वडिलांच्या मित्रांनाच तिने‎गंडवल्याचे समोर आले आहे.‎भारतीय संरक्षण मंत्रालयातील टेंडर‎देण्याचे आमिष दाखवून १४ कोटी‎४९ लाख रुपये ५० हजार १६३‎रुपयांना चुना लावल्याचे तक्रारीत‎म्हटले आहे.‎ कश्मिरा संदीप पवार‎(रा.सदरबझार, सातारा), गणेश‎हरीभाऊ गायकवाड‎(गडकरआळी, सातारा) , युवराज‎भीमराव झळके (रा.कामाठीपुरा,‎सातारा) यांच्यासह अनिल वायदंडे‎या मृत व्यक्तीवर गुन्हा दाखल‎झाला आहे. याप्रकरणी प्रमोद‎तानाजी जगताप (वय ४८,‎रा.संभाजीनगर, सातारा सध्या रा.‎धायरी, पुणे) यांनी पोलीस ठाण्यात‎तक्रार दिली आहे. याबाबत अधिक‎माहिती अशी, ही घटना २०१७ ते‎जुलै २०२३ या कालावधीत घडली‎असल्याचे तक्रारदार प्रमोद जगताप‎यांनी तक्रारीत म्हटले आहे.‎तक्रारदार यांचा फॅब्रिकेशनचा‎व्यवसाय आहे. संशयित‎कश्मिरासह सर्वजण त्यांना भेटले.‎ कश्मिरा ही पंतप्रधान‎कार्यालयामध्ये पंतप्रधान यांची‎राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून‎तशी कागदपत्रे संशयितांनी‎दाखवली. संरक्षण मंत्रालय, भारत‎सरकार यांना २१५ कोटी रुपयांचे‎साहित्य पुरवण्याचे टेंडर तुम्हाला‎मिळवून देतो, असे संबंधितांनी‎जगताप यांना सांगितले. तसेच फुड‎कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जम्मू‎काश्मीर यांना १९७ कोटी रुपयांचे‎धान्य पुरवण्याचेही टेंडर देतो, असे‎सांगून फसवणूक केली. या प्रकरणी‎पोलिसांचा तपास सुरु आहे.‎

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article