दहा वर्षांपूर्वीचे पाणी बंद करण्याचे विधान भोवले:अजित पवार यांना कोर्टाचे समन्स

5 hours ago 1
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती कोर्टाकडून समन्स बजावण्यात आले आहे. माझ्या उमेदवाराला मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करू, असे विधान २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत केले होते. या प्रकरणी हे समन्स बजावण्यात आले आहे. माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे हे २०१४ च्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार होते. त्या वेळीदेखील खोपडे यांनी तक्रार दाखल केली होती. काय आहे नेमके प्रकरण? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथील मासाळवाडी या गावात २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौरा सुरू होता. या गावात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न त्या वेळी होता. तेव्हा प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावाचे पाणी बंद करू. तुमचा पाण्याचा प्रश्न दोन महिन्यांत सोडवतो, आम्हालाच मतदान करा, अशी दमदाटी केली असल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. याच संदर्भात सुरेश खोपडे यांनी याचिका दाखल केली होती. त्यामुळे आता अजित पवार यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article