अभिनेता आणि व्याख्याता अशी ओळख असणाऱ्या राहुल सोलापूरकर इतिहासात एक नवा जावई शोध लावला. त्याच्या विधानांनंतर महाराष्ट्रात तीव्र संतापही व्यक्त होतोय कारण सोलापूरकर आजवरच्या इतिहासकारांवरच नाही तर शिवकाळातील संदर्भच खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सरकार यावर काय करत आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल.
आपल्या अकल्याचे तारे तोडून जगतील सर्वात मोठी सुटका या नटानं एक कथा ठरवली. आग्र्यामधून निसटून ज्या शिवाजी राजांनी आलमगीर औरंगजेबाच्या अब्रुची जगभर ढिंडवडे काढले त्यात सुटकेला अभिनेता कम व्याख्यात असलेला राहुल सोलापूरकर एक कथा म्हणतोय. आग्र्यातून सुटकेसाठी शिवाजी राजांनी औरंगजेबाची बायको आणि त्याच्या वजीरांना लाच दिल्याचा जावई शोध सोलापूरकरने लावलाय. म्हणजे ज्या मोघल काळात स्त्रियांचा चेहराही दिसणे दुरापास्त होतं. दरबारी राजकारणापासून ज्या कोसो दूर होत्या, तिथं औरंगजेबाच्या बायकोन लाच घेतल्याचा नवा इतिहास सोलापूरकर सांगतोय. ज्या स्त्रीचा नवरा दख्खन आणि इतर काही भाग वगळता जवळपास साऱ्या देशाचा बादशहा होता. त्या औरंगजेबाच्या पत्नीला नेमके कशासाठी लाच हवी होती हे काही सोलापूरकर सांगितलेलं नाही. ज्या औरंगजेबान आपला सख्खा बाप आणि बादशहा राहिलेला शहाजहानला त्याच्या आग्र्याच्या किल्ल्यावर आठ वर्ष कैद केलं होतं, तो कसा काय लाच देऊन सुटू शकला नाही याच उत्तर सोलापूरकडे नाहीये. सोलापूरकर ज्या मोहसीन किंवा मोहिन खानचं नाव घेतोय त्या नावाचं पात्र नेमक्या कोणत्या इतिहासाच्या पानावर आहे याचाही प्रश्न अनेक इतिहासकारांना पडलाय. साम्राज्यवादी औरंगजेब कोणत्या थरांला जातो हे त्याच्या वजीरापासून साऱ्या मोघलांना माहीत होतं. कारण औरंगजेबान जन्मदा त्या बापाला तुरुंगात सडवून मारलं आणि सख्या भावांलाही बेहाल करून ठार केलं. त्याचा वजीरच विटूर होता तर मग त्या पुढचीही अनेक वर्ष तो राज्य कसा काय करू शकला यावर सोलापूरकर गप्प आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट
Published on: Feb 05, 2025 10:11 AM