Raj Thackeray MNS Manifesto: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी शुक्रवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा फक्त जाहीरनामा नाही तर त्यात केलेल्या घोषणा कशा पद्धतीने पूर्ण करणार? हे सुद्धा दिले आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला १९ वर्ष झाले आहे. या १९ वर्षांत मनसे काय, काय केले? त्याची माहिती दिली आहे, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
अनेकांनी आम्ही काय करू एवढंच दिलं. आम्ही काय करू आणि कसं करू ते जाहीरनाम्यात टाकलं आहे. मी २००६ रोजी राज्याची ब्ल्यू प्रिंट घेऊन येईल सांगितलं होते. ती २०१४ला आली. पण या काळात मला हिणवलं गेलं. कुत्सितपणे प्रश्न विचारलं गेलं. २०१४ला ती प्रसिद्ध झाली. त्यावेळी युती तुटली होती. पण गेल्या दहा वर्षात ब्ल्यू प्रिंटमध्ये काय आहे, कशी केली वगैरे कुणी मला विचारलं नाही. आज जाहीरनामा प्रसिद्ध करताना ब्ल्यू प्रिंटच्या अनेक गोष्टी टाकल्या आहेत. कारण विषय आणि प्रश्न बदलले नाही. त्यामुळे हा जाहीरनामा तुमच्यासमोर ठेवत आहे.
आमच्या अनेक लोकांना मी इथे बोलावलं नाही. कारण ते मतदारसंघात प्रचार करत आहे. त्यामुळे त्यांना त्रास दिला नाही.
पहिला सेक्शन आहे, त्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान आहे. महिला, आरोग्य प्राथमिक शिक्षण, रोजगार वगैरे आहे. पुढच्या सेक्शनमध्ये दळणवळण, पाण्याचं नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण इंटरनेट आहे तिसरा सेक्शन, प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन
चौथा मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन आदी विषयांना आम्ही हात लावला आहे. या गोष्टी कशा सोडवू शकतो त्याचा उपायही दिला आहे. आम्ही डिटेल्समध्ये काम केलं आहे.