Raj Thackrey : महिलांना अशा प्रकारे पैसे देण्यापेक्षा राज्यात…. लाडकी बहीण योजनेवरून काय म्हणाले राज ठाकरे ?

2 hours ago 1

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली असून राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं.

 महिलांना अशा प्रकारे पैसे देण्यापेक्षा राज्यात.... लाडकी बहीण योजनेवरून काय म्हणाले राज ठाकरे ?

राज ठाकरे

| Updated on: Sep 28, 2024 | 12:44 PM

विधानसभा निवडणुका समोर ठेवून मतदारांना, प्रामुख्याने महिलांना आकर्षित करण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली असा आरोप विरोधकांकाडून सातत्याने केला जातोय. मात्र विरोधकांच्या पोटात दुखतंय असं म्हमत सरकार या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यात मग्न आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. जुलै महिन्यात घोषणा झालेल्या या योजनेसाठी आत्तापर्यंत लाखो महिलांनी अर्जकेले असून अनेकींचा खात्यात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे जमा झालेत. मात्र विरोधांकाची त्यावरून अद्याप टीका सुरूच असून आता त्यामध्ये एका नेत्याचे नाव जोडलं गेलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवरून महत्वाचं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे कसून तयारीला लागली असून राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. अमरावतीमध्ये पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. ‘ जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत’ असं राज ठाकरे म्हणाले. ‘ राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. महिलांन अशा प्रकारे पैसे न देता राज्यात नवीन उद्योग आणा’ असं म्हणत राज ठाकरेंनी या योजनेवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

बातमी अपडेट होत आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article