पुण्यातील कोंढवा परिसरात १४ लाखांचे मेफेड्रोन जप्त:दोन आरोपींना अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

2 hours ago 1
पुणे शहरातील कोंढवा परिसरात मेफेड्रोन विक्रीसाठी आलेल्या दोन जणांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून पकडले. त्यांच्या ताब्यातून १४ लाखांचे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. जहीर उर्फ साद गनी खान (वय 20), आदनान शाबीर शेख (वय 25, दोघे रा. कोंढवा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आणि पथक कोंढवा परिसरात गस्त घालत होते. कोंढव्यातील ओपेल पलक सोसायटीसमोर दोन जण थांबले असून, त्यांच्याकडे मेफेड्रोन हा अंमली पदार्थ असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी खान आणि शेख यांना छापा टाकून पकडले. त्यांची अंगझडती घेण्यात आली, त्यावेळी दोघांकडून १४ लाख रुपयांचे ६३ ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, अझिम शेख, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, दिशा खेवलकर यांनी ही कारवाई केली. मागील 9 महिन्यांत साडेतीन हजार कोटींचे मेफेड्रोन जप्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अंमली पदार्थ मुक्त पुणे मोहिम राबविण्याचे आदेश दिले आहेत. पुणे पोलिसांनी मागील नऊ महिन्यात साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. शहरात गांजा, मेफेड्रोन विक्री, तसेच तस्करी करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. महाविद्यालयीन युवकांना अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या तस्करांवर गुन्हे शाखेच्या पथकांकडून नजर ठेवण्यात आली आहे. गांज्याच्या तुलनेत मेफेड्रोन महाग असून त्याची नशा अधिक काळ राहते. अनेक तरुण अंमली पदार्थांच्या व्यसनांच्या आहारी गेले असल्याचे पोलिसांच्या वेळोवेळी केलेल्या कारवाईतून दिसून येऊ लागले आहे. हेही वाचा... दाम्पत्याचा वाद अन् भावाचा बहिणीच्या नवऱ्यावर चाकू हल्ला:पत्नीनेही दिली साथ, पुण्याच्या हडपसर भागातील घटना हडपसर परिसरात राहत असलेल्या एका दाम्पत्याच्या भांडणात मेहुण्याने तरुणावर धारदार चाकूने वार केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणी जखमी झालेल्या तरुणीच्या पत्नीसह मेहुण्याविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर बातमी वाचा... सायबर चोरट्याने तरुणाला लावला गंडा:चार लाखांची फसवणूक, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल पोलिस असल्याचे सांगून एका तरुणाची ४ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी गुरूवार पेठेत राहणार्‍या ३१ वर्षीय तरुणाने खडक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार अज्ञात सायबर चोरट्याविरुद्ध फसवणूकीसह आयटी एक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर बातमी वाचा...

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article