पुसद (Yawatmal):- अर्बन को. ऑप. बँकेने कर्जदाराला त्यांची मालमत्ता तारण ठेऊन व्यवसाय वाढीसाठी कर्ज दिले मात्र नियमित कर्ज (loan) भरणा न केल्याने ते कर्जखाते एन.पी.ए. झाले. त्यामुळे बँकेने कर्ज वसुलीसाठी सेक्युटायझेशन ऍक्ट (सरफेसी) आणि महा. को. ऑप. सोसा. ऍक्ट चे कलम १०१ नुसार वसुलीसाठी जप्तीची कार्यवाही सुरु करुन कर्जदारास नोटीसा दिल्या.
पुसद न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
त्या नोटीसच्या अनुशंगाने कर्जदार बशिर खान अमीर खान व ईतर वारस सलीम खान बशिर खान, जमीर खान काशर खान, अकबर खान बशिर खान, ख्वाजा बी सैफुल्ला खान,सी. मुमताज बी पती शेख निसार, यांनी पुसद येथील वि. दिवाणी न्यायाधिशव. स्तर पुसद येथे स्पे. दि. मु. नं. ०३/२०१७ हा दाखल करुन त्या मध्ये हर्रासी न करण्यासाठी तात्पुरता मनाई हुकुम व गहाण मालमत्तेच्या सरस निरस मानाने वाटणी होवुन वादीचा हिस्सा अलग वाटुण त्यांचे ताब्यात मिळणे बाबत, तसेच वाटणी होवुन वादींना ताबा मिळ पावेतो प्रतिवादी पुसद अर्बन बँक यांनी दाव्यातील मालमत्तेवर (गहाण असलेल्या मालमत्तेवर) कर्जाच्या बोजाचा गैरफायदा घेवुन वादीचा हक्क डावलून ईतरांना विक्री किंवा हर्रास करु नये व त्या मालमत्तेवर त्रयस्त पक्षाचे हितसंबंध निर्माण करु नये असा प्रतिवादी पुसद अर्बन बँक(Urban Bank) विरुध्द कायम मनाई हुकुन देण्यात यावा अशा मागणीचा दावा दाखल केला होता. त्यामध्ये प्रतिवादी पुसद अर्बन बँक adv. बालाजी कपटे यांचे मार्फत हजर होऊन दाव्याला जवाब दिला. १३ सप्टेंबर २०२४रोजी येथील एस. एन. नाईक वि. दिवाणी न्यायाधिश व. स्तर पुसद यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेच्या आदेश ७ नियम ११ ड अन्वये वादपत्र फेटाळण्यात येते असा बँकेच्या बाजूने महत्वपुर्ण निकाल पारीत केला.