रथसप्तमीनिमित्त सूर्यनमस्कारPudhari News Network
Published on
:
04 Feb 2025, 10:45 am
Updated on
:
04 Feb 2025, 10:45 am
ठाणे : आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकारातून आयोजीत या उपक्रमात रथसप्तमीनिमित्त मुरबाड विधानसभा मतदारसंघात विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सूर्यनमस्कार घालण्यात आले. बदलापूर, मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांनी विद्यार्थी यामध्ये सहभाग झाले.
मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने रथसप्तमीच्या मुहुर्तावर एक लक्ष सुर्यनमस्कार उपक्रम हाती घेण्यात आला. गेल्या एक महिन्यांपासून सुमारे 117 महाविद्यालय आणि 250 शाळांमध्ये या कार्यक्रमाची तयारी सुरू होती.
200 पेक्षा अधिक प्रशिक्षक एक महिन्यांपासून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष सराव करून घेत होते. त्यामुळे मंगळवारी (दि.4) रथसप्तमीच्या सूर्यनमस्कार या उपक्रमात सुमारे एक लाख विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि कर्मचाऱ्यांनी सुर्यनमस्कार घातल्याची माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली. मुंबई विद्यापीठ आणि डॉ. कुकरेजा यांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
राज्य सरकारला विनंती करणार की, योग प्रशिक्षणाला शाळांमध्ये मानधनावर योगशिक्षक नेमण्याची परवानगी द्यावी. ज्यामुळे सशक्त भारत, मजबूत भारत होण्यास मदत होईल.
किसन कथोरे, आमदार, मुरबाड. ठाणे
मंगळवारी (दि.4) बमुरबाड विधानसभा मतदारसंघातील विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सकाळपासूनच सुर्यनमस्कार घालण्यासाठी विद्यार्थांची योगा मॅट आणि त्यासोबतच सूर्यनमस्कारसाठी लागणारी तयारी केली. बदलापूर पूर्वेतील आदर्श शैक्षणिक संस्थेच्या भव्य पटांगणात चार वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांमधून सकाळी आठच्या सुमारास विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सुर्यनमस्कार घातले.