पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने इंग्लंडला 4-1 ने लोळवलं. आता वनडे मालिकेत दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी या मालिकेचा फायदा होणार आहे. यासाठी दोन्ही संघांनी आपला संघ आधीच जाहीर केला आहे. मात्र पहिला वनडे सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. 6 फेब्रुवारीला पहिला सामना होणार असून दोन दिवसाआधीच फॉर्मात असलेल्या खेळाडूची संघात एन्ट्री झाली आहे. टी20 मालिकेत इंग्लंडला बॅकफूटवर ढकलेल्या फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची संघात एन्ट्री झाली आहे. बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे. वरुण चक्रवर्ती इंग्लंड विरूद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने एकूण 14 विकेट बाद केले होते. वरुण चक्रवर्ती सध्या फॉर्मात आहे आणि त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकतं. वरुण चक्रवर्तीने भारतासाठी एकही वनडे सामना खेळलेला नाही.
बीसीसीआयने याबाबतची अधिकृत घोषणा करताना परिपत्रकात लिहिलं आहे की, निवड समितीने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीची टीम इंडियात निवड केलेली आहे. इंग्लंडविरुद्ध वरुण चक्रवर्तीने 14 विकेट घेतले आहेत. यात राजकोटमध्ये त्याने पाच विकेट घेतलेल्या. सर्वोत्तम गोलंदाजीमुळे वरुण चक्रवर्तीला मालिकावीराचा पुरस्काराने गौरविण्यात आले होते. वरुण चक्रवर्तीला नागपूरमध्ये वनडे टीममध्ये सहभागी केलं आहे.
🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨
Varun Chakaravarthy added to India’s squad for ODI bid against England.
Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 4, 2025
इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक. पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडचा संघ: जोस बटलर (कर्णधार), जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल साल्ट, मार्क वूड
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
- भारत विरुद्ध इंग्लंड, पहिला एकदिवसीय सामना: 6 फेब्रुवारी 2025, नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- भारत विरुद्ध इंग्लंड, दुसरा एकदिवसीय सामना: 9 फेब्रुवारी 2025, कटक (बारबाटी स्टेडियम)
- भारत विरुद्ध इंग्लंड, तिसरा एकदिवसीय सामना: 12 जानेवारी 2025, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)