तुम्ही अनेक लोकांना असे बोलताना ऐकले असेल की, जर तुमच्या चेहऱ्यावर देखील दुधासारखी चौमक आली तर खूप छान होईल. पण चेहऱ्यावर दुधाळ चमक मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले जातात. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी मार्केटमध्ये अनेक क्रिम्स उपलब्ध आहेत. परंतु या क्रिम्सच्या वापरामुळे तुमची त्वचा खराब दिसू लागते. बाजारात मिळणाऱ्या क्रिम्समध्ये भरपूर प्रमाणात रसायनांचा वापर केला जातो. तुम्ही चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळवण्यासाठी काही घरगुती उपाय करू शकता.
अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन हजारो रूपये खर्च करतात परंतु चेहऱ्यावर चमक दिसून येत नाही. चमकदार त्वचेसाठी तुम्ही दुधाचा वापर करू शकता. दुधाचा वापर तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. पर्लरमध्ये जाऊन चमकदार मिळवण्यापेक्षा तुम्ही घरच्या घरी दुधाचा वापर करून चमकदार त्वचा मिळवू शकता. परंतु, चेहऱ्यावर दुधावाचा वापर करण्यापूर्वी काही विशेष गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते. तुम्हाला जर दुधापासून कोणत्याही प्रकारची ऍलर्जी असण्याची शक्यता आहे.
कच्चे दुध तुमच्या चेहऱ्यावर क्लिंजर म्हणून वापरले जाते. कच्च्या दुधाचा तुमच्या चेहऱ्यावर क्लिंजर म्हणून वापरायचे असेल तर कापसावर कच्चे दुध घ्या आणि हलक्या हातानी ते दुध तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर लावून घ्या. त्यानंतर 10 मिनिटांवी कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा उपाय केल्यामुळे तुमचा चेहरा चमकू लागतो. तुम्हाला सूर्यप्रकाशामुळे टॅनिंगच्या समस्या उद्भवत असतील तर तुम्ही 2 चमचे कच्च्या दुधामध्ये 1 चमचा बेसन किंवा चंदर पावडर मिसळा. हा लेप तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर 10 मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा लेप चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार होण्यास मदत होते. चमकदार त्वचेसाठी तुम्ही चेहऱ्यावर कच्च दुधा आणि हळदीचा लेप लावू शकता. 1 चमचा कच्च्या दुधामध्ये मध आणि हळद मिसळा आणि हा लेप तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटांनंतर धुवा. हळदीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट्स आणि अँटि-बॅक्टिरियल गुणधर्म असतात ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स सारख्या समस्या होत नाही.
हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते. अशा परिस्थितीत, कोरड्या त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी, कच्च्या दुधात 2-3 थेंब खोबरेल तेल किंवा बदाम तेल मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटांनी कोमट पाण्यानी चेहरा धुवा. या पॅकच्या नियमित वापरामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि निरोगी होईल आणि तुम्हाला महागड्या फेशियलवर पैसे खर्च करण्याची गरज लागणार नाही.