गणेश तांगडे तांगडे यांचे आवाहन!
रिसोड (Risod) : शासनाकडून रेशन कार्ड मधील प्रत्येक सदस्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. ई-केवायसी (E-KYC) न करणाऱ्या सदस्यांचे धान्य बंद होणार आहे. त्यामुळे माहे फेब्रुवारी महिन्यात नजीकच्या रास्त भाव दुकानात आधार कार्ड सोबत घेऊन जाऊन ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाचे (Supply Department) निरीक्षण अधिकारी गणेश तांगडे (Ganesh Tangde) यांनी केले आहे.
ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे धान्य बंद होणार…
शासन (Government) अन्न धान्य वितरण प्रणाली अंतर्गत शिधापत्रिकेतील सर्व सदस्यांनी ई-केवायसी करणे शासनाने अनिवार्य आहे. त्यामुळे शिधापत्रिकेत (Ration Card) नावे असलेल्या प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी आपल्या गावातील किँवा नजीकच्या परिक्षेत्रात रास्त भाव धान्य दुकानात जाऊन तेथे उपलब्ध करून दिलेल्या ई-पॉस डिजिटल यंत्रामध्ये आधार क्रमांक सिडींग करून घ्यावयाचा आहे. अवघ्या काही सेकंदाची ही प्रक्रिया असुन ई-केवायसी पूर्ण झाल्यावरच आगामी काळात लाभार्थ्यांच्या नावाने धान्य वितरणाचा लाभ देण्यात येणार आहे. प्रत्येक धान्य दुकानात ई-केवायसी प्रक्रिया निःशुल्क सुरू आहे. स्वस्त धान्य दुकानातील पॉस मशीनवर (POS Machine) अंगठ्याचा ठसा देवून शिधापत्रिकेतील प्रत्येक सदस्य लाभार्थ्यांनी के वायसी करून घ्यावी. ज्या सदस्य लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली नाही त्यांचे धान्य बंद होणार आहे.
रेशन कार्डधारक अथवा त्यामधील सदस्य बाहेरगावी कामानिमित्त गेले असल्यास, त्या लाभार्थी सदस्याला त्या ठिकाणी सुध्दा ई-केवायसी करता येणार आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना कळवावे. अशी माहिती पुरवठा निरीक्षक गणेश तांगडे यांनी दिली.