हिंगोली (Sharad Chandra Pawar) : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांचा २७ जानेवारीला दौरा निश्चीत झाला आहे. २७ जानेवारी रोजी खा. शरदचंद्र पवार हे नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील दौरा आटोपून नांदेड येथून हेलिकॅप्टरव्दारे ११.३५ वाजता हिंगोलीत येणार आहेत. प्रारंभी दुपारी १२ वाजता नर्सी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या मंदिराचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर स्वातंत्र्य सैनिक माणिकराव देशमुख टाकळगव्हाणकर यांच्या जन्मशताब्दी सोहळयास उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १.१५ वाजता हॉटेल शांतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर, माजी मंत्री सुर्यकांत पाटील, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी दिली आहे.