पोलिसाचा तिसर्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्येचा प्रयत्नFile Photo
Published on
:
08 Feb 2025, 9:35 am
Updated on
:
08 Feb 2025, 9:35 am
शिर्डी: शहरातील एका इमारतीमध्ये पत्नी व मुलीसह राहत असलेल्या पोलिस कर्मचार्याने राहत्या इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर साईनाथ सुपर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही घटना 3 फेब्रुवारी 2025 रोजी रात्रीच्या वेळी घडली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
संबंधित पोलिस कर्मचारी बरीच वर्षे शिर्डी येथे कर्तव्यावर होते. सध्या ते संगमनेर पोलिस ठाण्यात बदलीने गेलेले आहेत. दरम्यान, शिर्डी येथील इमारतीच्या तिसर्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ते पोलिस दलात हुशार, मोठा जनसंपर्क व मोठे नेटवर्क असल्याने परिचित होते. शिर्डी येथे असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. अत्यंत मनमिळावू स्वभाव असल्याने या घटनेच्या वृत्ताने पोलिस दलामध्ये खळबळ उडाली आहे.