सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांचे हस्ते संपन्न
अमरावती (Short Film Katkom) : प्राचार्य डॉ.एकनाथ तट्टे लिखित व वनीता तट्टे निर्मित मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या खडतर जीवनाशी संबंधीत लघुपट काटकोम आणि होळी पर्वानिमित्त साजरा होणारा आदीम संस्कृती उत्सव फाग वरील माहितीपट यांचे स्क्रिनिंग व लोकार्पण सोहळा प्राचार्य डॉ. आराधना वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली प्रसिद्ध सिने व टीव्ही अंभिनेते वऱ्हाड भूषण भारत गणेशपुरे यांच्या शुभहस्ते रिफॉर्मस् क्लब अमरावती येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी प्राचार्य आर. बी. महाजन, अनंतराव सोमवंशी, डॉ.पी. आर. राजपूत तसेच विशेष अतिथी उद्योजक चंद्रकांत पाटील, साहित्यिक अशोक मानकर, समाजसेवक दिलीप ठाकरे, विदर्भ आंदोलन समिती प्रदेश अध्यक्ष रंजना मामर्डे, माजी पोलीस अधीक्षक राजेश कावळे, पुरोगामी विचारवंत पंकज वैद्य प्रामुख्याने उपस्थीत होते.लघुपट काटकोम आणि माहितीपट फाग याच्या निर्मात्या वनीता एकनाथ त्तट्टे दिग्दर्शक व पटकथा लेखक अजय तायडे आणि आकाश मेश्राम, कार्यकारी निर्माता मंगेश मालठाणे, कलावंत रविकिरण कांडलकर, किशोर तळोकार, विज्ञप्ती पर्वतकार, पुरब जाधव, रवींद्र खंडेराव, कैलास पेंढारकर, सागर जामूनकर छायाचित्रकार ईशांत जेठानी पार्श्वसंगीत चेतन ठाकुर तसेच इतर विभाग सांभाळणारे सहकारी योगेश रायजादे, विभांशु उके , मोहम्मद अजहर, निखिल नंदवंशी, विनोद तट्टे, पियुषपाल चिंचोळकर, वासुकी वक्ते,हरिष ढवळे यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. एकनाथ तट्टे, किशोर तळोकार, ईशान जेठानी, मंगेश मालठाणे, अजय तायडे, निखिल नंदवंशी, योगेश रायजादे, पंकज वैद्य, लीला वैद्य, यांनी परिश्रम घेतले.