Sri Siddheshwar Bhagwan Yatra: श्री सिद्धेश्वर भगवान यात्रा महोत्सवात तब्बल 51 क्विंटलचा महाप्रसाद…

6 days ago 2

श्री सिद्धेश्वर भगवान प्रगट दिन यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न

देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (Sri Siddheshwar Bhagwan Yatra) : श्री सिद्धेश्वर भगवान प्रगट दिन यात्रा महोत्सव श्रीक्षेत्र कोलारा येथे 14 नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाला. यात्रा महोत्सव ही ग्रामीण महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये परिसरामध्ये दरवर्षी एक यात्रा भरत असते त्या त्या भागातील देवस्थानाच्या ठिकाणी तिचे स्वरूप भव्य दिव्य ठरत असते चिखली तालुक्यातील श्रीक्षेत्र कोलारा येथे (Sri Siddheshwar Bhagwan Yatra) श्री सिद्धेश्वर भगवान (कालभैरव) प्रगट दिन व यात्रा महोत्सव हा त्यापैकीच एक श्री सिद्धेश्वर भगवंताच्या अनेक कथा लोक श्रद्धापूर्वक सांगत असतात अनेकांनी त्याचे श्रद्धेतून अनुभव घेतलेले असतात त्यामुळे देवाचे भक्तगण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत या यात्रेच्या निमित्ताने कोलारा व पंचक्रोशीतील बाहेरगावी असलेले नागरिक गावांमध्ये येतात आणि मनोभावे देवाची आराधना करतात विशेष म्हणजे कोलारा गावातील लेकीबाळी ईतर ठिकाणी दिलेल्या असतात त्या सुद्धा दिवाळी भाऊबीज दिला नाही येणे झाले तरी यात्रेच्या निमित्ताने हमखास कोलारा गावामध्ये येतात आणि भक्ती भावाने देवाचे आशीर्वाद घेत असतात यात्रेनिमित्ताने धार्मिक विधी पार पडतात.

यामध्ये घटस्थापना ,अभिषेक, पोशाख, ध्वजाअर्पण, देवाचे पूर्ण उपवास, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद् भागवत महापुराण, पाच दिवसाचे उपवास, पुराणू वाचन, पारायण वाचन, नगर प्रदक्षिणा आधी कार्यक्रम मोठ्या भक्ती भावाने साजरे होतात 14 नोव्हेंबरला सकाळी दिंड्यांच्या सोहळ्यामध्ये नगरप्रदर्शना करण्यात येते यावेळी सुवासिनी आपापल्या घरासमोर सडा सारवण करून रांगोळी घालून दिंड्यांचे आणि पालखीचे मनोभावे स्वागत व पूजन करतात या भावभक्तीच्या कार्यक्रमांमध्ये या वर्षी हरणामाता भजनी दिंडी, सिद्धीविनायक भजनी मंडळ दिंडी , गुरुदेव भजनी मंडळ, संत सखूबाई भजनी मंडळ, गजानन भजनी मंडळ जय मल्हार भजनी मंडळ सुभद्रा भजनी मंडळ, सिद्देश्वर भजनी मंडळ, संत मीराबाई भजनी मंडळ,स्वात्मानंद महाराज भजनी मंडळ सहभाग नोंदविला होता. भाविक भक्तांनी रांगेत लागून श्री सिद्धेश्वर भगवंताचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले.

भाविक भक्तांसाठी करण्यात आलेल्या महाप्रसाद वाटपाची सुरवात

संस्थानचे (Sri Siddheshwar Bhagwan Yatra) अध्यक्ष साहेबराव पाटील सोळंकी, व उपाध्यक्ष सखाराम सोळंकी सचिव भगवान सोळंकी, विश्वस्त धोंडू पाटील सोळंकी, शंकर बोरसे, भरत सोळंकी ,मोहन सोळंकी, मानसिंग सपकाळ, आधीसह गावातील व उपस्थित भक्तांच्या हस्ते करण्यात आले यात्रा महोत्सवाला ना. प्रतापराव जाधव, केंद्रिय मंत्री आयुष विभाग , आमदार सौ. श्वेताताई महाले, चिखली, माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, चिखली ,. प्रा. नरेंद्रजी खेडेकर माजी जि.प.अध्यक्ष, . सुरेशआप्पा खबुतरे,डॉ. प्रतापसिंह राजपुत, नानासाहेब बोंद्रे,. अभिजितदादा राजपूत, चिखली, अशोकराव पडघान, माजी सभापती, जि.प. बुलडाणा ,सौ. मनिषाताई सपकाळ, माजी सदस्य, पं. समिती चिखली, सौ. वनिताताई रामेश्वर सोळंकी, सरपंच कोलारा ,तसेच ईश्वरराव इंगळे अध्यक्ष खरेदी विक्री संस्था चिखली, अंकुशराव पडघान पाटील, रमेश खेडेकर, प्रताप कुटे, शिवाजी कुटे, हरिभाऊ परिहार, डॉ. संदिप जवंजाळ, डॉक्टर विठ्ठल काळुसे, डॉक्टर अनुपमा काळुसे ,डॉक्टर सागर चिंचोले ,डॉक्टर नेहा चिंचोले, परमेश्वर सोळंकी, लक्ष्मण अक्कर विष्णू घुबे, राजाभाऊ खरात, सिताराम सोळंकी, भगवानराव सोळंकी, गजानन परिहार, रोहित खेडेकर,एस व्हि इंगळे, भिकाजी सोळंकी, सचिन बोन्द्रे, जयराम जगताप सेंट्रल बँक ऑफ इंडिया गांगलगाव मॅनेजर, प्रशांत देशमुख, अँड. संजय सदार ,सुमंथा राजपुत येळगाव, सुनील पवार, रमेश म्हस्के यांच्यासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर भगवान यात्रा महोत्सवात 51 क्विंटलचा महाप्रसाद

श्री सिद्धेश्वर भगवान यात्रा महोत्सव (Sri Siddheshwar Bhagwan Yatra) निमित्त श्रीक्षेत्र कोलारा येथे भव्य यात्रा महोत्सव चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांसोबत कबड्डी सामने आणि इतरही कार्यक्रम मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते कबड्डी सामन्यामध्ये विजेत्या तीन संघांना 51000 चे बक्षीस वितरित करण्यात आले ते बक्षीस चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे बंधू शिवराज पाटील यांनी दिले व अंकुशराव पाटील यांच्या हस्ते ते विजेत्या संघाला देण्यात आले या यात्रेमध्ये सहभागी भक्तांसाठी 51 क्विंटल अन्नधान्याचा महाप्रसाद वितरित करण्यात आला.

श्री सिद्धेश्वर भगवान संस्थान कोलारा यांच्या वतीने (Sri Siddheshwar Bhagwan Yatra) श्री सिद्धेश्वर (श्री काळभैरव) प्रकट दिन यात्रा महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते याही वर्षी ते करण्यात आली आहे या कार्यक्रमानिमित्ताने चिखली परिसरातील तसेच राज्यभरातील श्री सिद्धेश्वर भगवंतावर श्रद्धा असलेले भावी भक्त मोठ्या संख्येने येथे येत असतात यासाठी ग्रामस्थांच्या वतीने भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले असते यामध्ये 51 क्विंटलचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.

विशेष म्हणजे यासाठी लागणारा स्वयंपाक गावकरी स्वतः करतात आणि पोळ्या पंचक्रोशीतील कोलारा, मुरादपूर, भालगाव ,बेराळा, रोहडा, खैरव ,भानखेड, येवता , अंचरवाडी, गांगलगाव, चंदनपुर ,मुंगसरी, शेलगाव जहांगीर, खंडाळा मकरध्वज या गावातील महिला वर्गाकडून निशुल्क आणि श्रद्धापूर्वक वर्षानुवर्षापासून या महाप्रसादासाठी करून दिल्या जातात हे विशेष. यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणात दुकाने लागलेली होती महिला वर्गांने मोठ्या प्रमाणात या दुकानातून खरेदी करून मोठी आर्थिक उलाढाल यामधून होत असते रात्रीच्या वेळी मंदिरावरील तसेच मंदिर परिसरातील विद्युत रोषणाईने यात्रेची शोभा वाढवली होती एकंदरीतच कोलारा येथील (Sri Siddheshwar Bhagwan Yatra) श्री सिद्धेश्वर भगवंताची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्ती भावात संपन्न झाली

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article