Published on
:
20 Jan 2025, 10:42 am
Updated on
:
20 Jan 2025, 10:42 am
पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक सकारात्मक संकेत आणि बँकिंग शेअर्समधील तेजीच्या जोरावर आज सोमवारी भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी हिरव्या रंगात बंद झाले. सेन्सेक्स ४५४ अंकांनी वाढून ७७,०७३ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १४१ अंकांच्या वाढीसह २३,३४४ वर स्थिरावला.
क्षेत्रीय पातळीवर ऑटो आणि एफएमसीजी वगळता इतर सर्व निर्देशांक तेजीत बंद झाले. बँक, मीडिया, मेटल, कॅपिटल गुड्स, पीएसयू बँक, टेलिकॉम, पॉवर हे निर्देशांक १ ते २ टक्के वाढले. तर बीएसई मिडकॅप ०.६ टक्के आणि स्मॉलकॅप ०.८ टक्के वाढला.
कोटक बँकेचा शेअर्स तब्बल ९ टक्के वाढला, झोमॅटो घसरला
कोटक महिंद्रा बँकेने तिमाही नफ्यात १० टक्के वाढ नोंदवली आहे. या पार्श्वभूमीवर सेन्सेक्सवर कोटक बँकेचा शेअर्स तब्बल ९.१ टक्के वाढला. बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्के वाढले. त्याचबरोबर एनटीपीसी, एसबीआय, पॉवर ग्रिड, टाटा स्टील हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स हे हेवीवेट शेअर्सही हिरव्या रंगात बंद झाले. तर दुसरीकडे झोमॅटोचा शेअर्स ३ टक्के घसरला. अदानी पोर्ट्स, टीसीएस, एम अँड एम हे शेअर्स सुमारे १ टक्के घसरले.
निफ्टीवर विप्रोचा शेअर्स ६.५ टक्के वाढला. तर एसबीआय लाईफचा शेअर्सचा शेअर्स २.८ टक्के घसरला. ट्रेंट, श्रीराम फायनान्स, एचडीएफसी लाईफ आणि अदानी पोर्ट्स हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले.