कळमनुरी ते शेंबाळ पिंपरी रस्त्यावरील झरा पाटी जवळील घटना
कळमनुरी/हिंगोली (Trolley Accident) : औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी व राजदरी येथील भाविक क्रुझर जीपमधून वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट येथे देवदर्शनासाठी जात असताना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास कळमनुरी ते शेंबाळ पिंप्री मार्गावरील झरा पाटीवर रस्त्याच्या कडेला असलेल्या (Trolley Accident) ऊसाच्या ट्रॉलीवर भरधाव क्रुझर आदळून १३ भाविक जखमी झाल्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले.
१४ नोव्हेंबर शुक्रवार रोजी मध्यरात्री १२.३० वाजेदरम्यान औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी व पिंपळदरी ता. औंढा नागनाथ येथील भाविक विदर्भातील वर्धा जिल्हातील टाकळघाट येथे देवदर्शनासाठी जात असताना झरा फाटा येथे क्रुजर वाहन क्रमांक एम.एच.३७-जी.७४३९ ची (Trolley Accident) धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला बसली. या अपघातात चालका सोबत एकूण १३ रुग्ण उपजिल्हा रुग्णालय कळमनुरी येथे रुग्णवाहीके द्वारे आणण्यात आले.
जखमींमध्ये विठ्ठल कुंडलिक डुकरे (३२), रुक्मिणी कुंडलिक डुकरे (६५), रेखा विठ्ठल डुकरे (२७), कुंडलिक पांडुजी डुकरे (५६) सर्व रा. पिंपळदरी ता. औंढा ना., भाऊराव केशवराव कर्हाळे (३५), चंद्रकला केशव कर्हाळे (६०), केशवराव भाऊराव कर्हाळे (५८) , सुनील केशवराव कर्हाळे (२८), शिवश्री भाऊराव कर्हाळे (५), वैष्णवी सुनील कर्हाळे (१९), गोकर्णा भाऊराव कर्हाळे (२५) सर्व रा. राजदरी ता. औंढा ना. अंकुश शिवाजी कदम (३५) रा. फुल धाबा ता औंढा ना. बजरंग बाबारावं चांदणे (२२) ( क्रुझर चालक) रा. सावंगी ता. औंढा ना. यांचा समावेश आहे. या सर्व (Trolley Accident) अपघातग्रस्त रुग्णांना सेवेवर उपस्थित डॉ. दिशांकी गुरडवार, डॉ आनंद मेने, डॉ ऋषिकेश सूर्यवंशी, डॉ. पोले, डॉ. पंचलिंगे यांनी तातडीने प्राथमिक उपचार केले.
यावेळी श्रीमती पाईकराव, ठोंबरे, धनई, खोडे ब्रदर, वाणी, करण जाधव, मेघा, रमा इत्यादी यांनी (Trolley Accident) रुग्णाच्या उपचारात मदत केली. एकूण १३ पैकी ७ रुग्णांना कळमनुरी ग्रामीण रूग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय हिंगोली व वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे संदर्भीत करण्यात आले. ज्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे संदर्भीत रुग्ण-अंकुश शिवाजी कदम वय ३५ वर्षे, विठ्ठल कुंडलिक डुकरे वय ३२ वर्षे, रुक्मिणा कुंडलिक डुकरे वय ६५ वर्षे तर हिंगोलीतील शासकीय रूग्णालयात बजरंग बाबारावं चांदणे वय २२ वर्षे, चंद्रकला केशव कर्हाळे वय ६० वर्षे, केशव भाऊराव कर्हाळे वय ५८ वर्षे, भाऊराव केशव कर्हाळे वय ३५ वर्षे यांचा समावेश आहे.
या (Trolley Accident) सर्व रुग्णांना अपघात स्थळाहून उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्ण वाहिकेद्वारे आणण्यासाठी पिंटू गडदे, अप्पाराव कदम, १०८ चे डॉ. पोले यांनी मदत केली. अपघातस्थळी कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक टिकाराम राठोड ,जमादार रवी इंगोले, शिवाजी देमगुंडे, संजय राठोड, प्रशांत शिंदे, गजानन होळकर यांच्या पथकाने धाव घेतली होती.