चाणक्य हे त्या काळातील एक महान विद्वान होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये मनुष्यानं आदर्श पद्धतीनं जीवन कसं जगावं? आयुष्य जगताना काय करावं? काय करू नये? याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहे. त्यातील अनेक गोष्टी आजही आपल्याला जीवन जगताना उपयोगी ठरत आहेत. चाणक्य यांनी जसं मानवी आयुष्याबद्द सांगितलं आहे, तसेच त्यांनी एक आदर्श पती-पत्नीचं नातं कसं असावं? पती कसा असावा, पती कसा असू नये, पत्नी कशी असावी, पत्नी कशी असू नये याबाबत देखील अनेक गोष्टी आपल्या चाणक्य नीती या ग्रथांमध्ये सांगितल्या आहेत.
चाणक्य म्हणतात काही महिला अत्यंत सुंदर असतात, मात्र त्यांच्यामध्ये एकही गूण नसेल तर अशा महिलेशी लग्न करणं टाळवं, कोणत्या महिलेसोबत लग्न करू नये, याबाबत चाणक्य काय म्हणतात जाणून घेऊयता.
चाणक्य नीतीनुसार ज्या महिलांचं लग्नाआधी जर एखाद्या पुरुषावर प्रेम असेल तर अशी महिला दिसायला कितीही सुंदर असली तरी तिच्यासोबत लग्न करू नये, कारण यामुळे तुमच्यावर पश्चतापाची वेळ येऊ शकते.
रागीट स्त्री – चाणक्य नीतीनुसार जर एखादी स्त्री ही सुंदर असेल पण रागीट स्वभावाची असेल तर अशा स्त्री सोबत लग्न करू नका यामुळे तुमचा संसार उद्धस्त होऊ शकतो. घरात सतत छोट्या -छोट्या गोष्टीवरून भांडणं होतील, घर अशांत राहील त्याचा परिणाम हा तुमच्या आयुष्यावर आणि इतर कुटुंबातील सदस्यांवर होतो, त्यामुळे असं लग्न टाळावं.
पैशांची उधळपट्टी – चाणक्य म्हणतात पैसे, धन द्रव्याची बचत हा स्त्रीचा नौसर्गिक स्वाभाव आहे. कुठल्याही पुरुषाची बायको ही आपल्या पतीच्या कमाईतील पैसे वाचवते तेच वाचलेले पैसे त्यांना संकट काळात उपयोग पडतात, मात्र जर एखाद्या स्त्रीचा स्वाभाव हा पैशांची उधळपट्टी करणारा असेल तर तिच्यासोबत लग्न करताना विचार करावा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)