महाराष्ट्राला महिला CM मिळालेली पाहायचंय:शरद पवारांनी व्यक्त केली इच्छा, पोटातले आले ओठावर

2 hours ago 1
महाराष्ट्राला आता महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे, असे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. शिरूरमधील वडगाव सराई येथील आयोजित सभेत बोलताना शरद पवारांनी ही इच्छा बोलून दाखवली. शरद पवारांच्या विधानावरून महाविकास आघाडीची सत्ता आल्यास सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत एकही महिला मुख्यमंत्री लाभली नाही. त्यामुळे महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार याबाबत नेहमीच चर्चा होत असते. त्यातच शरद पवारांनी यांनी व्यक्त केलेल्या इच्छेमुळे यंदा महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री भेटेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. नेमके काय म्हणाले शरद पवार? शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवारांच्या पोटातले ओठावर आले. “आमच्या सत्ताकाळात राज्यामध्ये महिलांना 30 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभरात लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे.” असे शरद पवार यावेळी म्हणाले. पोटातले आले ओठावर दरम्यान, एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुम्ही सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करणार का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना शरद पवार यांनी नेमके उत्तर पोटातच ठेवले, ते ओठांवर येऊ दिले नाही. सुप्रियाला संसदीय राजकारणातच रस आहे. विधिमंडळाच्या राजकारणात रस नाही. लोक काहीही म्हणत असले तरी शेवटी आपल्या पसंतीचाही विचार महत्त्वाचा असतो. आमचे लोक निवडून आल्यानंतर एकत्र बसून काय तो निर्णय घेतील, असे उत्तर शरद पवार यांनी दिले होते. मात्र, आज शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई येथील सभेत बोलताना त्यांच्या मनातील ओठावर आल्याचे पहायला मिळाले.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article