‘कधी रागवतो, लोकांना घाम फोडतो, बापू नेहमी लक्षवेधीच’, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

2 hours ago 1

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज पुरंदरमध्ये सभा पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार विजयबापू शिवतारे यांचं कौतुक केलं. “पुरंदर शत्रूच्या हाती पडता कामा नये. शिवतारे यांनी शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. विजय सोपान शिवतारे ऐकल्यावर अमिताभ यांचा डायलॉग आठवतो. सोपान म्हणजे शिडी. ते विजयाची गुढी उभारणार. आडनाव शिवतारे शिव त्यांना तारणार. सांगा कोणी माय का लाल आडवू शकतो का? शिवतारेंचा विजय म्हणजे काळ्या दगडावरची भगवी रेघ. पुरंदर हवेलीकडे अनेकांच लक्ष आहे. बापू नेहमी लक्षवेधीच असतात. त्यांचं लक्ष विकास करणे. त्यांचं काम आहे, एक घाव दोन तुकडे. हा गडी कट्टर शिवसैनिक, राग आला की रुसतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“माणसाने शेवटी स्वत:साठी नाही तर मतदार यांच्या प्रेमासाठी तडजोड करावी लागते. विद्यमान आमदार नावापूरते आहेत. विकासाची धारा म्हणजे आमदार नसताना देखील सगळ्यांचे लक्ष बापूंकडे असतं. बापूंना कळतं कोणाला कसं वळवायचं. बापूंच्या मागे शिंदे उभा राहिला. जेजूरीसाठी ७८ कोटींची योजना मंजूर केली. खंडोबा विकास आराखडासाठी पैसे दिले. nबापू कधी रागवतो. लोकांना घाम फोडतो”, अंस एकनाथ शिंदे स्पष्ट म्हणाले.

‘धनुष्यबाण शिवाय चक्रव्यूह भेदता येत नाही’

“विजयबापू काम करत होते तेव्हा आमदार काय करत होते? विमानतळासाठी सगळ्यांना विश्वासात घेतलं जाईल. हा शिंदेचा शब्द आहे. विजय बापू इंजिनिअर आहेत. तुम्ही त्यांना दोन वेळा निवडून दिलं. मध्ये गॅप पडला. नाहीतर चौकार मारला असता. विजय बापूंचा ११० टक्के विजय पक्का. त्यांच्या पाठीला माती लावण्यासाठी अनेकजन देव पाण्यात ठेवून बसले आहेत. धनुष्यबाण शिवाय चक्रव्यूह भेदता येत नाही”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे लाडकी बहीण योजनेवर काय म्हणाले?

“ते म्हणतात हे बंद करु ते बंद करु. अरे चालू कर ना. आम्ही सरकारमध्ये आल्यावर सगळी बंद पडलेली कामे सुरु केली. मागच्या अडीच वर्षात सिंचन प्रकल्प फक्त ४ मान्य झाले. लाडकी बहीण योजनेवर टीका करतात. त्यांना काय कळणार दीड हजार? पण शिंदेला माहिती आहे. माझी आई कशी घर चालवायची मी पाहिलं आहे. तेव्हा मी ठरवलं, जेव्हा माझ्या हातात येईल, मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी काम करणार”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“आपण वचननामा काढला. ये तो ट्रेलर हैं पिच्चर अभी बाकी हैं. बहिणींना लखपती झालेलं बघायचं आहे. शेतकऱ्यांना १२ हजार देत होतो. आता १५ हजार करण्याचा निर्णय घेतला. लाडक्या बहिणींना १५०० चे २१०० रुपये मदत करण्याचा निर्णय घेतला”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर निशाणा

“बापूंकडची कामे होतीलच. या राज्यात सर्वसामान्य माणूस सत्येचा खूर्चीत बसतो. सीएम म्हणजे कॉमन मॅनचे सरकार. आता कॉमन मॅनला सुपर मॅन बनवायचे. एक काम करा. मी गेल्यावर इतरांना सांगा. लाडक्या भावाला भेटून आलो. मी योजना बंद पडू देणार नाही. मी शब्द दिला की दिला. दिलेला शब्द पाळणारा शिंदे आहे. जनतेच्या मनातल सरकार आणलं. नाहीतर सरकार अधोगतीला गेलं असतं”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

“बापू सुरुवातीपासून सोबत होते. सरकार पलटवायला वाघाचं काळीज लागतं. सरकारवरुन पायउतार व्हायला मोठं मन लागतं. आम्ही सत्ता सोडून गेलो. मी आज पाहतो केंद्र सरकार आपल्याला मदत करतंय. आपला एकही प्रस्ताव रिजेक्ट करत नाही. राज्यकर्त्यांना आपल्या राज्याला पुढे नेण्यासाठी तडजोड करायची असते. मला काय मिळालं त्यापेक्षा राज्याला काय पाहिजे हे पाहणारा मुख्यमंत्री पाहिजे. घरात बसणार, फेसबुक लाईव्ह करणारे सरकार नाही”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article