Published on
:
15 Nov 2024, 3:25 pm
Updated on
:
15 Nov 2024, 3:25 pm
प्रयाग चिखली, पुढारी वृत्तसेवा : क्षेत्र प्रयाग येथील कार्तिक स्वामी मंदिरामध्ये कृतिका नक्षत्रावर गुरुवारी (दि. १४) सायंकाळी सहापासून शुक्रवारी (दि.१५) उत्तर रात्रीपर्यंत हजारो भाविकांनी कार्तिक स्वामी दर्शनाचा लाभ घेतला.
चालू वर्षी गुरुवारी पुरुष मंडळींनी गंगेवरील स्नान, कार्तिक स्वामी दर्शन आणि दत्त दर्शनासाठी गर्दी केली होती. तर महिला भाविकांसाठी शुक्रवारी रात्री साडेनऊ पासून ते उत्तर रात्री तीन वाजेपर्यंत दर्शनाचे योग आहे. त्यानुसार शुक्रवारी रात्री पासून पहाटे तीन वाजेपर्यंत महिला भाविकांची कार्तिक स्वामी दर्शनासाठी गर्दी असणार आहे.
मंदिरातील पूजा विधी पुजारी रामगिरी गोसावी व ऋषिकेश गोसावी यांनी केली. दरम्यान, येथील तुळजाभवानी फाउंडेशन च्या वतीने संगमावरील घाटावर हजार दीप प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला.