आचारसंहिता भंगाच्या 7 हजार 360 तक्रारी निकाली:546 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी

2 hours ago 1
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल (C-Vigil) ॲपवर एकूण 7 हजार 400 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 7 हजार 360 तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. सी-व्हिजिल ॲपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे ॲप कोणत्याही ॲपस्टोअरमधून डाउनलोड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येते. 546 कोटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टोबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान धातू आदींच्या विरोधात केलेल्या कारवाईत एकूण 546 कोटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article