हिंगोली (Amit Shah) : या विधानसभा मतदार संघात झालेल्या विकास कामांची यादी माझ्या मतदार संघातील लोकांनी पाहिली तर माझेच कठीण होईल, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कौतुक केले. हिंगोलीत झालेल्या प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते.
जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हिंगोलीत गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची सभा शुक्रवारी पार पडली. यावेळी (Hingoli Assembly Elections) हिंगोली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार तान्हाजी मुटकुळे, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार संतोष बांगर यांच्यासह माजी आमदार गजाननराव घुगे, माजी रामराव वडकुते, डॉ.श्रीकांत पाटील, माजीनगराध्यक्ष बाबाराव बांगर, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पप्पू चव्हाण, भाजपा महिला जिल्हाध्यक्षा उज्वला तांभाळे, अॅड.मनिष साकळे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष दिवाकर माने, पांडूरंग पाटील, रमेशचंद्र बगडिया, भाजपा जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, धनगर समाजाचे नेते अशोकराव नाईक, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, उमेश नागरे, संजय कावडे, रवी पाटील, संतोष टेकाळे, हिंमत राठोड, शंभूसिंग गहिलोत हे पदाधिकारी उपस्थित होते.
मागील दहा वर्षांच्या काळात (Hingoli Assembly Elections) हिंगोली विधानसभा मतदार संघात मोठी कामे केली आहेत. महाविकास आघाडीवर हल्ला चढवित शाह (Amit Shah) म्हणाले की, आघाडी खोटारड्यांचा पक्ष आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेश व तेलंगणात काँग्रेसने केलेले सगळे वादे खोटे ठरले आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने जे जे सांगितले ते ते केले आहे. ७० वर्ष राम मंदिराचा प्रश्न काँग्रेसने लटकवून ठेवला. नरेंद्र मोदींनी सत्ता सूत्रे सांभाळताच पहिल्या पाच वर्षात जागाही मिळवली व मंदीरही बांधायला सुरूवात केली.
काँग्रेसच्या काळात देशभर बॉम्बस्फोट व्हायचे, मोदींनी उरी व पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यांचा दहा दिवसांत बदला घेत पाकिस्तानला नमवले, असेही ते (Amit Shah) म्हणाले. महाविकास आघाडीवर टिका करतांना ते पुढे म्हणाले की, औरंगाबाद, उस्मानाबाद व अहमदनगरचे संभाजीनगर, धाराशीव व अहिल्यानगर करणार्यां सोबत जायचे आहे की, ‘अजान’ची स्पर्धा ठेवणार्या उद्धव ठाकरेंच्या पक्षासोबत, हे जनतेनी ठरवायची वेळ आली आहे. हनुमान चालीसा वाचणार्याला उद्धव ठाकरेंनी तुरूंगात घातले, असा आरोपही यावेळी शहांनी केला. काँग्रेस पक्षाने जिवनभर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानच केला, काँग्रेसचे सरकार गेल्यानंतरच बाबासाहेबांना भारतरत्न मिळाले अशी आठवणही त्यांनी करून दिली.
सोनिया गांधी व मनमोहन सिंगांनी भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या स्थानी नेवून ठेवली होती. नरेंद्र मोदींनी भारताला पाचव्या क्रमांकावर आणले. २०२७ पर्यंत भारत जगातील तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असेल, असा दावाही अमित शहांनी केला. राज्यात युतीचे सरकार आल्यास शेतकरी सन्मान निधी १२ हजाराऐवजी १५ हजार होईल तर लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रूपये दिले जाणार आहे, अशी घोषणाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली.
अजित पवार व राजू नवघरेंचा नामोल्लेख टाळला
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा असल्याचे सांगण्यात आले असले तरी (Amit Shah) अमित शाहांनी या दोघांचाच नाव घेऊन उल्लेख केला. विशेष म्हणजे महायुती सरकारबाबत बोलतांनाही त्यांनी ‘शिंदे-फडणवीसांचे सरकार हे गोरगरिबांचे सरकार आहे’ असे बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नामोल्लेख टाळला. ही टाळाटाळ म्हणजे योगायोग आहे की, काही संकेत याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.