राज्यातील महायुतीमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार व सर्व सामान्य प्रचंड त्रस्त: आ. सुभाष धोटे सुभाष पोटे
देशोन्नती वृत्तसंकलन
चंद्रपूर (Vijay Vadettiwar) : महाराष्ट्र संस्कृतीला बदनाम करून पक्ष फोडले गेले. यातून स्थापन करण्यात आलेले घटनाबाह्य, महाभ्रष्ट महायुती सरकार हे आरक्षणाच्या विरोधात असून प्रचंड महागाई, बेरोजगारी, महीला अत्याचार रोखण्यात अपयशी ठरले आहे. (Ladki Bahin Yojana) लाडकी बहिण म्हणून १५०० रुपये दिले व लगेच खाद्यतेल, इलेक्ट्रिकचे दर वाढवून दुसऱ्या हाताने बहिणीकडून वसूल केले. आणि आता त्याच बहिणीना भाजप खासदारांकडून मतदानासाठी धमकविले जात आहे. ही मनुवादी संघ परिवाराविरुद्ध संविधान परिवाराची लढाई असून महाराष्ट्राची अस्मिता गुजरात चरणी गहाण ठेवणाऱ्या महाभ्रष्ट महायुतीच्या त्रिकूट सरकारला सत्तेतून दखल करा असे आवाहन राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केले.
ते कोरपना तालुक्यांतील नांदाफाटा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष धोटे (Subhash Dhote) यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेस संबोधित करताना बोलत होते. आयोजीत सभेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार सुभाष धोटे, संपत कुमार, उत्तमपेचे, विजय बावणे, अरुण धोटे, आशा खासरे, सविता टेकाम, अॅड. अरुण धोटे, स्वामी येरोलवार, अशोक बावणे, पापय्या पोनामवार, श्याम राऊत, संभाजी कोवे, अंकुश धाबेकर व अन्य मान्यवर यावेळी मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलतांना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) म्हणाले की, राजुरा क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र असून भाजपच्या महायुती सरकारने संपूर्ण औद्योगिक क्षेत्राला अदानीच्या दावणीला बांधले आहे. यामुळे कष्ट करणाऱ्या कामगारांना न्याय मिळत नाही. येथील सोयाबीन, कापूस धान या शेती उत्पादनाला रास्त भाव मिळत नाही. उलट रासायनिक खते, बियाणे, फवारणीसाठी लागणारे औषध व इतर साहित्याच्या प्रचंड दरवाढीने शेतकरी कर्जात बुडाला आहे. हे महणापी महायुती सरकार राज्याच्या जिवावर उठले असून केवळ भ्रष्टाचार आणि कमिशन खोरीत गुंतले आहे. अपक्ष उमेदवार निवडून येऊन जनमताचा आदर न करता केवळ स्व स्वार्थापोटी सत्तेच्या मागे पळतात असा टोला यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांचे उदाहरण देत लगावला.
येथील शेतकरी, कामगार व सर्व सामान्य यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष थोटे (Subhash Dhote) यांना विजयी करा. असे आवाहन त्यानी यावेळी केले. तर महाविकास आघाडी उमेदवार आ. सुभाष धोटे (Subhash Dhote) यानी शेतकरी पुत्र म्हणणारे शेतकरी संघटनेचे उमेदवार अॅड, चटप यांनी शेतकऱ्यांना गेली साडेचार वर्ष वाऱ्यावर सोडून १९९० पासुन प्रत्येक वेळी निवडणूक आली की, बाशिंग बांधले हेच आजवर केले आहे. महाविकास आघाडी सरकार काळात शेतमालाला रास्त भाव मिळत होता. आमच्या पक्षाने पंचसूत्री कार्यक्रम वचननाम्यात जाहीर केला असून यात महिला युवक, युवती, शेतकरी, कामगार, यांना विविध योजनांचा लाभ मिळणार असून सर्वांचे हित जोपासले जाणार असल्याचे आ. सुभाष धोटे (Subhash Dhote) म्हणाले. यावेळी महाविकास आघाडी व घटक पक्षाचे नेते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आयोजित सभेस बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.